प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 च्या रणधुमाळीला अधिकृत सुरुवात होत असतानाच शहरात पहिला उमेदवारी अर्ज दाखल होण्याची नोंद झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार आणि माजी उपमहापौर सचिन चिंचवडे यांनी प्रभाग क्रमांक 17 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करत शहरात ‘पहिला अर्ज’ दाखल करण्याचा मान (PCMC Election 2026)पटकावला आहे.
निवडणूक प्रक्रियेतील हा पहिला टप्पा असल्याने राजकीय वर्तुळात या घडामोडीला विशेष महत्त्व दिले जात आहे. भाजपकडून मिशन 2026 अंतर्गत तयारीला सुरुवात झाल्याचे संकेत या उमेदवारी अर्जातून स्पष्टपणे दिसून येत (PCMC Election 2026) आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिककेंद्रित धोरणे” या मुद्द्यांवर निवडणूक लढविणार असल्याचे सचिन चिंचवडे यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रभाग 17 मधील पायाभूत सुविधा, वाहतूक, पाणीपुरवठा आणि नागरी सोयीसुविधांबाबत पुढील काळात ठोस आराखडा मांडण्यात येणार असल्याचेही त्यांनी (PCMC Election 2026)सांगितले.
माजी उपमहापौर म्हणून केलेल्या कामांचा अनुभव आणि संघटनात्मक बांधणीच्या जोरावर आपण मतदारांचा विश्वास पुन्हा मिळवू, असा विश्वास चिंचवडे यांनी व्यक्त केला. शहरात सर्वात पहिला उमेदवारी अर्ज दाखल झाल्यामुळे भाजपच्या प्रचाराची सुरुवात इतर पक्षांपेक्षा आघाडीवर असल्याची चर्चा राजकीय विश्लेषकांमध्ये रंगू लागली (PCMC Election 2026) आहे.
पिंपरी-चिंचवड मनपा निवडणूक 2026 मध्ये प्रभाग 17 हा अत्यंत महत्त्वाचा आणि लक्षवेधी प्रभाग मानला जात असून, या प्रभागातून सचिन चिंचवडे यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीची रंगत आता अधिकच वाढली( PCMC Election 2026)आहे.
