“आईच्या डोळ्यांसमोर कोसळलं अख्खं आकाश…”
बारामतीजवळ घडलेल्या त्या भीषण विमान दुर्घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला सुन्न केलं. पण या दुर्घटनेचा सर्वात मोठा आघात बसला तो एका आईच्या (Tragic Incident) काळजावर…
सकाळ नेहमीसारखीच सुरू झाली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मातोश्री अधून मधून त्यांच्या फार्म हाऊस मध्ये राहतात. कालही त्या तिथेच होत्या, घरात टीव्ही सुरू होता. चहाचा कप हातात होता. पण अचानक पडद्यावर दिसलेल्या एका बातमीने त्या आईच्या काळजात चर्र झालं. लँडिंगदरम्यान विमान कोसळल्याची बातमी पाहताच तिचा श्वास अडखळला. क्षणभर तिने स्वतःला सावरलं… मनात एकच विचार — “नाही… असं काही होऊ शकत (Tragic Incident) नाही.”
सभोवतालचे लोक तिला धीर देत होते, शांत राहण्याची विनंती करत होते. पण आईचं मन कुठे थांबतं? मुलासाठी काळजीनं धडधडणारं हृदय कुठे ऐकतं (Tragic Incident)कुणाचं?

तिने स्वतःहून पुढे जाण्याचा निर्णय घेतला. पाय थरथरत होते, वय 80 च्या आसपास,,. डोळ्यांत भीती आणि आशेची एकत्र गर्दी होती. “माझा मुलगा ठीक असेल…” हीच भावना तिला पुढे नेत(Tragic Incident) होती.
दुर्दैवाने, नियतीनं क्रूर खेळ केला. अपघाताने अनेकांचे प्राण घेतले आणि एका आईकडून तिचं सर्वस्व हिरावून नेलं. तो क्षण फक्त एका कुटुंबाचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या काळजाला चिरणारा(Tragic Incident) ठरला.
आज राज्यभर शोककळा पसरली आहे. पण या सगळ्यात सर्वात जास्त शांतता पसरली आहे ती त्या (Tragic Incident)घरात —
जिथे आईच्या डोळ्यांतून शब्दही अश्रू होऊन गळत (Tragic Incident)आहेत…
जिथे पोटचा गोळा निघून गेल्याचं दुःख शब्दांत मांडणं अशक्य आहे… ज्याच्या खांद्यावरून अंतिम प्रवास करावा त्यालाच असा निरोप द्यावा लागणार… काय भावना असेल त्या पिकलेल्या पानाची? (Tragic Incident)मनाची?

हे विधात्या…. तू नेहमीच निष्ठुर का होतोस रे?
ही फक्त एक दुर्घटना नाही,
ही एका आईच्या आयुष्याची कायमची जखम(Tragic Incident) आहे…
….. खरोखरचं मनाची अवस्था 24 तासानंतरही सुन्नच(Tragic Incident) आहे… तशीच राहील कदाचित.. पुढील काही काळ
विवेक कुलकर्णी
