प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महापालिकेकडून शहरातील स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सातत्याने धडक मोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेअंतर्गत नोव्हेंबर महिन्यात आठही क्षेत्रीय कार्यालयांच्या कार्यक्षेत्रातून एकूण २८ लाख १२ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नागरिकांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण व्हावी आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे, या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात (PCMC Fine Action)आले.
शहर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, उप आयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल आणि सहायक आयुक्त अमित पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई मोहीम (PCMC Fine Action)राबवली गेली.
या मोहिमेत क्षेत्रीय अधिकारी निवेदिता घार्गे, राजाराम सलगर, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, तानाजी नरळे, किशोर ननावरे, अतुल पाटील आणि पूजा दूधनाळे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. सहायक आरोग्य अधिकारी तथा निरीक्षकांनीही या मोहिमेत महत्त्वाची भूमिका(PCMC Fine Action) बजावली.
महापालिकेने खालील स्वच्छता नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई (PCMC Fine Action)केली:
• सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे
• ओल्या व सुक्या कचऱ्याचे विलगीकरण न करणे
• प्लास्टिकचा अवैध वापर
• दुकानदारांकडे दोन डस्टबिन नसणे
• सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणे
महापालिकेच्या म्हणण्यानुसार, स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करणे आवश्यक आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कारवाई चालू राहणार असल्याची माहिती उप आयुक्त, आरोग्य विभागाचे डॉ. प्रदीप ठेंगल (PCMC Fine Action)यांनी दिली.
