पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून, चिंचवड येथे सर्वाधिक २०६.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ भोर येथे १७२ मिलिमीटर पाऊस पडला. जिल्ह्यातील अनेक भागांत १०० मिलिमीटरच्या आसपास किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले=Pune Rain Red Alert )आहे.
५ जुलै रोजी सकाळी ८.३० ते ६ जुलै रोजी सकाळी ८.३० या २४ तासांच्या कालावधीत पाषाण येथे ११३ मिमी, दुदुळगाव येथे ११० मिमी, शिवाजीनगर येथे १०८.४ मिमी, निमगिरी येथे ९९ मिमी, एनडीए परिसरात ९८.५ मिमी, राजगुरूनगर येथे ९५ मिमी आणि दापोडी येथे ९३ मिमी पावसाची नोंद(Pune Rain Red Alert) झाली.
तसेच माळीण येथे ८३ मिमी, शिरूर येथे ७४.५ मिमी, हवेली येथे ५४ मिमी, दौंड येथे ४५ मिमी, तर बारामती येथे १५.६ मिमी पावसाची नोंद झाली (Pune Rain Red Alert)आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. वाढत्या पाणीपातळीमुळे आळंदीतील इंद्रायणी नदीवरील सर्व पूल तात्पुरते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून, नागरिकांनी नदीकाठावर जाणे टाळावे, असे प्रशासनाने आवाहन केले (Pune Rain Red Alert)आहे.
दरम्यान, वडीवळे धरणातून २,१७२ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून, नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले (Pune Rain Red Alert)आहे.
हवामान विभागाने पुढील काही काळ पुणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले (Pune Rain Red Alert)आहे.
