पिंपरी-चिंचवड/प्रतिनिधी:पिंपरी-चिंचवड शहरातील काळभोर नगर परिसरात बालचोरीच्या संशयावरून एका महिलेला संतप्त नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले (Child Safety) आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला परिसरात संशयास्पद हालचाली करत फिरताना काही नागरिकांच्या नजरेस पडली. तिच्या वागणुकीबाबत संशय आल्याने नागरिकांनी तिला अडवून चौकशी केली. दरम्यान, तिची झडती घेतली असता तिच्या बॅगमध्ये चाकू, गुंगीचे औषध आणि स्प्रे आढळून आल्याने परिस्थिती गंभीर (Child Safety) बनली.
यानंतर संतप्त नागरिकांनी महिलेला ताब्यात घेऊन तत्काळ पिंपरी पोलिसांकडे सुपूर्द केले. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली असून तिचा नेमका हेतू काय होता, ती खरोखर बालचोरीच्या प्रयत्नात होती का, तसेच तिच्यासोबत इतर कोणी साथीदार आहेत का, याबाबत तपास सुरू आहे. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात (Child Safety)आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे शहरात लहान मुलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता संशयास्पद व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले(Child Safety) आहे.
