प्रतिनिधी:गुरुवारी मोठी घसरण नोंदवल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी सोने आणि चांदीच्या दरांनी जोरदार पुनरागमन केले आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) तसेच सराफा बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंमध्ये लक्षणीय वाढ पाहायला मिळाली असून, सोने आणि चांदीने नवे उच्चांक गाठले आहेत.गुरुवारी चांदीचे दर तब्बल २० हजार रुपयांनी घसरले होते, तर सोन्याच्या किमतींमध्ये सुमारे ४ हजार रुपयांची घट झाली होती. मात्र, आज या घसरणीची भरपाई होताना दिसत असून बाजारात पुन्हा तेजीचे वातावरण निर्माण झाले (Gold Silver Price )आहे.
MCX वर सोने-चांदीत मोठी उसळी
मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर ५ मार्च रोजी संपणाऱ्या वायद्याच्या चांदीच्या दरात सकाळीच सुमारे १३ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आणि दर ३,३९,९२७ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले. त्यानंतर दुपारी साडे बारा वाजेपर्यंत चांदीचे दर सुमारे ७ हजार रुपयांच्या वाढीसह ३,३४,५०५ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत (Gold Silver Price ) होते.
त्याचप्रमाणे MCX वर ५ फेब्रुवारीला संपणाऱ्या वायद्याच्या सोन्याच्या दरांनीही तेजी दाखवली. सुरुवातीला सोन्याचे दर सुमारे ३ हजार रुपयांनी वाढून कमाल १,५९,२२६ रुपये प्रति तोळ्यापर्यंत पोहोचले. दुपारी साडे बारा वाजेपर्यंत सोन्याचे दर सुमारे १,३०० रुपयांच्या तेजीसह १,५७,७२८ रुपये प्रति तोळ्यावर व्यवहार करत (Gold Silver Price ) होते.
सराफा बाजारातील स्थिती
सराफा बाजारातही आज सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. गुरुवारच्या तुलनेत सोन्याचे दर सुमारे ४,३०० रुपयांनी वाढले असून, चांदी तब्बल १९,२४९ रुपयांनी महागली आहे.जीएसटीसह चांदीचा दर ३,२८,५२८ रुपये प्रति किलो झाला आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा जीएसटीसह दर १,६०,०९० रुपये प्रति तोळा नोंदवला गेला (Gold Silver Price ) आहे.
विविध कॅरेट सोन्याचे आजचे दर
सराफा बाजारात २३ कॅरेट सोन्याच्या दरात सुमारे ४,२८३ रुपयांची वाढ झाली असून, दर १,५४,८०६ रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहेत. जीएसटीसह एका तोळ्याचा दर १,५९,४५० रुपये असून, यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.२२ कॅरेट सोन्याच्या दरातही सुमारे ३,९३९ रुपयांची वाढ झाली असून, एका तोळ्याचा दर १,४२,३७२ रुपये झाला आहे. जीएसटीसह हा दर १,४६,६४३ रुपये इतका (Gold Silver Price ) आहे.
१८ कॅरेट सोन्याचा दर सुमारे ३,२२५ रुपयांनी वाढून १,१६,५७१ रुपये प्रति तोळा झाला आहे. जीएसटीसह याचा दर १,२०,०६८ रुपये आहे.
तर १४ कॅरेट सोन्याचा दर सुमारे २,५१५ रुपयांनी वाढून ९०,९२५ रुपये प्रति तोळा झाला (Gold Silver Price ) आहे.
जानेवारीत सोन्याची मोठी झेप
जानेवारी महिन्यात सोन्याच्या दरात एकूण २२,२३३ रुपयांची वाढ झाली असून, वर्षाच्या सुरुवातीलाच सोन्याने जोरदार झेप घेतल्याचे चित्र आहे. सध्या जीएसटीशिवाय सोन्याचा दर १,५५,४२८ रुपये प्रति तोळा असून, चांदीचा जीएसटीशिवायचा दर ३,१८,९६० रुपये प्रति किलो आहे.
गुरुवारी चांदीचा जीएसटीशिवाय दर २,९९,७११ रुपये, तर सोन्याचा दर १,५१,१२८ रुपये (Gold Silver Price ) होता.
दर वाढण्यामागचे कारण
तज्ज्ञांच्या मते, शेअर बाजारातील वाढती अस्थिरता हे सोने-चांदीच्या दरवाढीमागील प्रमुख कारण आहे. शेअर बाजारात अनिश्चितता वाढल्यास गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. तसेच, चांदीचा औद्योगिक वापर वाढत असल्याने तिच्या किमतींनाही आधार मिळत (Gold Silver Price ) आहे
