प्रतिनिधी | पिंपरी-चिंचवड:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज स्थायी समितीसह विधी, शहर सुधारणा, शिक्षण, महिला व बालकल्याण तसेच क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक अशा एकूण पाच विषय समित्यांवर सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. नवनियुक्त सदस्यांचे महापौर रवी लांडगे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा (PCMC Standing Committee) दिल्या.
महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत समित्यांवरील सदस्यनियुक्तीचा विषय सभापटलावर मांडण्यात आला. पक्षीय बलाबलानुसार सदस्यांची निवड करण्यात (PCMC Standing Committee)आली.
भारतीय जनता पक्षाचे पक्षनेते प्रशांत शितोळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते भाऊसाहेब भोईर आणि शिवसेनेचे गटनेते विश्वजित बारणे यांनी विषय समितीनिहाय नावे बंद लिफाफ्यात पिठासीन अधिकारी रवी लांडगे यांच्याकडे सादर केली. त्यानंतर सभागृहात समितीनिहाय सदस्यांची नावे जाहीर करण्यात(PCMC Standing Committee) आली.
महानगरपालिकेच्या विकासात्मक, सामाजिक आणि प्रशासकीय कामकाजात या समित्यांची महत्त्वाची भूमिका असते. नव्याने निवड झालेल्या सदस्यांकडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक आणि परिणामकारक काम होईल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त(PCMC Standing Committee) केला.
स्थायी समिती (१६ सदस्य)
महापालिकेतील सदस्यसंख्येनुसार स्थायी समितीत भाजपला ११, राष्ट्रवादी काँग्रेसला ४ आणि शिवसेनेला १ जागा मिळाली (PCMC Standing Committee) आहे.
भारतीय जनता पार्टी
अभिषेक बारणे, शालिनी गुजर, मनिषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारीका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, शीतल वर्नेकर, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब (PCMC Standing Committee) त्रिभुवन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
सविता आसवानी, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास (PCMC Standing Committee) साने
शिवसेना
सुलभा उबाळे
विधी समिती
भाजप
ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, सुजाता बोराटे, श्रुती डोळस, (PCMC Standing Committee) कुशाग्र कदम
राष्ट्रवादी काँग्रेस
शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे
शहर सुधारणा समिती
भाजप
अर्चना सस्ते, विनोद नढे, कुणाल वाव्हळकर, संजय (नाना) काटे, सुहास कांबळे, उत्तमराव केंदळे
राष्ट्रवादी काँग्रेस
डॉ. वैशाली घोडेकर-लोंढे, अनंत कोऱ्हाळे, वैशाली काळभोर
क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती
भाजप
कैलास कुटे, शाम जगताप, तानाजी बारणे, धर्मपाल तंतरपाळे, उदय गायकवाड, योगेश लांडगे
राष्ट्रवादी काँग्रेस
भाऊसाहेब भोईर, जितेंद्र ननावरे, प्रमोद कुटे
शिक्षण समिती
भाजप
पल्लवी वाल्हेकर, श्रुती वाकडकर, रविना आंगोळकर, कविता भोंगाळे, रीटा सानप, सारिका बोऱ्हाडे
राष्ट्रवादी काँग्रेस
प्रियांका कुदळे, योगिता बारणे, यश साने
महिला व बालकल्याण समिती
भाजप
पल्लवी जगताप, नीता पाडाळे, रेश्मा भुजबळ, शिवानी नरळे, राणी पठारे, सुप्रिया चांदगुडे
राष्ट्रवादी काँग्रेस
निकिता कदम, सारिका मासूळकर, मनिषा लांडे
अध्यक्षपदाकडे लक्ष
समिती सदस्यांची निवड झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष स्थायी समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीकडे लागले आहे. महापालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प सादर करण्यासाठी स्थायी समितीचे गठन आवश्यक असल्याने अध्यक्षपदाच्या निवडीला विशेष महत्त्व (PCMC Standing Committee) आहे.
नवनियुक्त सदस्यांमधून एकाची अध्यक्षपदी निवड करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, लवकरच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार(PCMC Standing Committee) आहे.
महापौर रवी लांडगे यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांचे अभिनंदन करत शहराच्या विकासासाठी सर्वांनी समन्वयाने व पारदर्शकपणे काम करण्याचे आवाहन(PCMC Standing Committee) केले.

