संभाजीनगर, चिंचवड (दि. ६ मार्च):जागतिक महिला दिन आणि कवयित्री व शिक्षिका योगिता कोठेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत ‘संस्कार शिदोरी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तसेच राज्यस्तरीय काव्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. हा कार्यक्रम संभाजीनगर येथील महात्मा फुले विद्यालय येथे आयोजित करण्यात आला (Book Launch) होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीपाल सबनीस , अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (८९ वे) तथा विवेकवादी विचारवंत यांच्या हस्ते झाले. तर साहित्यिक ललिता सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न (Book Launch)झाला.
या सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या विविध भागांतून कवी, साहित्यिक आणि साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली(Book Launch) होती.
कार्यक्रमाला साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सीताराम नरके यांनी जबाबदारी पार पाडली. यावेळी ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण, डॉ. धनंजय भिसे, पुरुषोत्तम सदाफुले, तुकाराम पाटील, बाबू डिसोजा आणि प्रा. महादेव रोकडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन(Book Launch) केले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन राजश्री मराठे, प्रतिमा काळे आणि कविता काळे यांनी (Book Launch)केले.
राज्यस्तरीय काव्य संमेलनाची रंगत
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ गझलकार म. भा. चव्हाण यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या संमेलनाचे अध्यक्षपद डॉ. शैलेंद्र भास्कर भणगे यांनी (Book Launch)भूषवले.
या काव्य संमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून आलेल्या कवी-कवयित्रींनी आपल्या उत्कट कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यामध्ये नितीन भोसले, प्रतिमा काळे, कविता काळे, राजश्री वाणी मराठे, रेवती साळुंके, रेणुका हजारे, आशा नष्टे, माधुरी वैद्य डिसोजा, आत्माराम हारे, वैशाली लांडगे, राजेश चौधरी, धनंजय इंगळे, ॲड. चंद्रकांत गायकवाड, लक्ष्मण शिंदे, बाळासाहेब गिरी, राम सर्वगोड, अनिल केंगार, आशा शिंदे, सतीश कांबळे, सुरेश डी. पवार, हेमंत जोशी, चंद्रकांत जोगदंड, सुनिता पडवळ, अशोक सोनवणे, सुवर्णा वाघमारे, सुभाष चटणे, जयद्रथ आखाडे, स्नेहा शेखर पाठक, शांताराम सोनार, दत्तू ठोकळे, प्रधान मृणाल, महादेव रोकडे, विलास बाबर, मेहमुदा शेख, रामचंद्र पाचूनकर, राहुल भोसले आदी कवींनी सहभाग(Book Launch) नोंदवला.
संस्कार शिदोरी आणि ‘योगिता :
एक काव्य प्रवास’ पुस्तकांचे प्रकाशन उत्साहात याच वेळी जेष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण यांच्या हस्ते ‘योगिता : एक काव्य प्रवास’ या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या काव्यसंग्रहाचेही प्रकाशन करण्यात(Book Launch) आले.
पुस्तक प्रकाशन आणि राज्यस्तरीय काव्य संमेलनाचा संगम घडल्याने उपस्थित साहित्यप्रेमींना एक समृद्ध, प्रेरणादायी आणि संस्मरणीय सांस्कृतिक पर्व अनुभवायला(Book Launch) मिळाले.
