पिंपरी, दि. १३ : साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्यासाठी ठोस कार्यक्रम राबविण्याचा निर्धार ‘साहित्य संवर्धन आघाडी’ने व्यक्त केला. अध्यक्षपदाचे उमेदवार योगेश सोमण यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका (Sahitya Sanvardhan Aghadi) मांडली.
या वेळी प्रमुख कार्यवाह पदाच्या उमेदवार डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष पदाचे उमेदवार प्रदीप निफाडकर आणि पुणे जिल्हा कार्यवाह पदाचे उमेदवार संदीप भानुदास तापकीर उपस्थित होते.
परिषदेचा कारभार घटनात्मक, पारदर्शक आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल, असे सोमण यांनी सांगितले. जिल्हा शाखांना दरवर्षी अर्थसाहाय्य देऊन स्थानिक साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना चालना दिली जाईल, अशी माहिती डॉ. महाळंक यांनी दिली. दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन, तसेच युवा लेखकांसाठी कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याचा मानस व्यक्त करण्यात (Sahitya Sanvardhan Aghadi) आला.
निफाडकर यांनी मराठी भाषा परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न, परिषदेच्या वास्तूसाठी विस्तीर्ण जागा, आर्थिक स्वावलंबनासाठी नवे स्रोत आणि ‘साहित्य पत्रिका’चे मुद्रित पुनरुज्जीवन याबाबत भूमिका स्पष्ट केली. आजीव सदस्यांना अल्पदरात सभागृह उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन देण्यात (Sahitya Sanvardhan Aghadi) आले.
तापकीर यांनी ‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख करत, आगामी ‘१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या’ निमित्ताने १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर केले. ‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जागतिक स्तरावर मराठी बांधवांना जोडण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात (Sahitya Sanvardhan Aghadi)आला.
या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी डॉ. स्वाती महाळंक, कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर आणि पुणे जिल्हा कार्यवाहपदासाठी संदीप तापकीर उमेदवार आहेत. मतदार सभासदांनी १२ मार्च २०२६ पर्यंत पुणे येथील कार्यालयात पोस्टाने किंवा प्रत्यक्ष उपस्थित राहून मतदान करावे, असे आवाहन आघाडीच्या वतीने करण्यात (Sahitya Sanvardhan Aghadi)आले.
