पिंपरी, दि. ११ एप्रिल २०२६(प्रतिनिधी ): समाजाशी नाळ जुळवून, सामाजिक जाणीवा जपत साहित्यनिर्मिती करणारा व्यक्तीच खरा साहित्यिक ठरतो, असे मत ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांनी व्यक्त केले. विवेक वसाहत, केशवनगर, चिंचवड येथे शब्दधन काव्यमंच आयोजित ‘चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत (Shabddhan Kavyamanch)होते.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाने करण्यात आली. तसेच जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या
‘आवडे हे रूप | गोजिरे सगुण | पाहता लोचन | सुखावले ||’
या अभंगाचे तानाजी एकोंडे यांनी सादर केलेल्या सुरेल गायनाने वातावरण भारावून (Shabddhan Kavyamanch) गेले.
प्रास्ताविकात अशोक महाराज गोरे यांनी शब्दधन काव्यमंचाच्या विविध साहित्यिक उपक्रमांचा आढावा घेतला. यावेळी सन्मानचिन्ह, ‘कृष्ण’ हा बृहद ग्रंथ, शाल व श्रीफळ देऊन अमित मुरडे, सुखदा मुरडे, सावी मुरडे यांच्या उपस्थितीत नंदकुमार मुरडे यांचा सन्मान करण्यात (Shabddhan Kavyamanch)आला.
संस्थापक-अध्यक्ष सुरेश कंक यांनी आपल्या मनोगतात, “आध्यात्मिकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम असलेले नंदकुमार मुरडे हे पिंपरी-चिंचवडच्या साहित्यविश्वाला लाभलेले एक अमूल्य वरदान आहेत,” असे गौरवोद्गार (Shabddhan Kavyamanch)काढले.

यावेळी शोभा जोशी, राधाबाई वाघमारे, राजेंद्र घावटे, सुभाष चटणे, वर्षा बालगोपाल, सविता इंगळे, हेमंत जोशी, नीलेश शेंबेकर, सीमा गांधी, ॲड. अंतरा देशपांडे, शहाजी कांबळे, पंजाबराव मोंढे, फुलवती जगताप आणि कल्पना बंब यांनी आपल्या मनोगतातून मुरडे यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याचा गौरव (Shabddhan Kavyamanch)केला.
सन्मानाला उत्तर देताना नंदकुमार मुरडे यांनी, “आशावाद आणि प्रयत्नवाद यांच्या बळावर जीवन अधिक अर्थपूर्ण बनवता येते आणि समाजासाठी सकारात्मक योगदान देता येते,” असे (Shabddhan Kavyamanch)सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय. के. शेख, पांडुरंग सुतार, दत्ता कांगळे, राजू जाधव, संगीता सलवाजी, प्रभाकर वाघोले, सुरेश जोशी आणि सुहास घुमरे यांनी सहकार्य केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले, तर मुरलीधर दळवी यांनी आभार(Shabddhan Kavyamanch) मानले.
शेवटी सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात (Shabddhan Kavyamanch)आली.
