पिंपरी (दिनांक : ०२ मे २०२६) — मधुश्री कला आविष्कार आणि स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, निगडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय ‘मधुश्री व्याख्यानमाला’ बुधवार, ०६ मे २०२६ पासून सुरू होत आहे. ही व्याख्यानमाला स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, प्लॉट क्र. ५१३, पेठ क्र. २७, संत तुकाराम महाराज उद्यानासमोर, निगडी प्राधिकरण येथे दररोज सायंकाळी ६:३० वाजता आयोजित करण्यात आली (Madhushree Vyakhyanmala) आहे .
सोळाव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या व्याख्यानमालेची सुरुवात बुधवार, ०६ मे रोजी होणार असून गणेश ठोकळ ‘स्वराज्याचा अपरिचित इतिहास’ या विषयावर पहिले व्याख्यान देतील. यावेळी लायन्स क्लब इंटरनॅशनलचे माजी रिजन चेअरमन दामाजी आसबे अध्यक्षस्थानी राहणार असून नगरसेविका शैलजा मोरे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित (Madhushree Vyakhyanmala) राहतील.
गुरुवार, ०७ मे रोजी डॉ. काशिनाथ देवधर ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर दुसरे व्याख्यान देतील. या सत्रासाठी उद्योजक अतुल इनामदार अध्यक्षस्थानी असतील, तर उपमहापौर शर्मिला बाबर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार(Madhushree Vyakhyanmala) आहेत.
व्याख्यानमालेचा समारोप शुक्रवार, ०८ मे रोजी चंद्रशेखर टिळक यांच्या ‘जागतिक राजकारण आणि काश्मीर’ या विषयावरील व्याख्यानाने होईल. या कार्यक्रमाला पद्मश्री गिरीश प्रभुणे अध्यक्षस्थानी असतील, तर नगरसेवक कैलास कुटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित (Madhushree Vyakhyanmala) राहतील.
दररोज सायंकाळी ६:०० ते ६:३० या वेळेत श्रोत्यांसाठी चहापानाची व्यवस्था करण्यात आली असून ही व्याख्यानमाला सर्वांसाठी नि:शुल्क आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या बौद्धिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मधुश्री कला आविष्कारच्या अध्यक्षा माधुरी ओक यांनी केले (Madhushree Vyakhyanmala) आहे.
