(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील पात्र सुरक्षा रखवालदारांना आता ‘सुरक्षा सुपरवायझर’ऐवजी थेट ‘सुरक्षा निरीक्षक’ (Security Inspector) पदावर पदोन्नती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विधी समितीच्या विशेष बैठकीत घेण्यात आला. संबंधित ठराव समितीने मंजूर केला असून अंतिम मंजुरीसाठी तो आगामी महापालिका सभेसमोर ठेवण्यात येणार (Security Inspector Promotion) आहे.
विधी समितीच्या सभापती सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस समिती सदस्य ज्ञानेश्वर जगताप, विनायक गायकवाड, कुंदा भिसे, श्रुती डोळस, कुशाग्र कदम, शेखर चिंचवडे, वर्षा जगताप, तुषार सहाणे तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित (Security Inspector Promotion)होते.
सध्या महापालिकेत सुरक्षा रखवालदारांना प्रथम ‘सुरक्षा सुपरवायझर’ आणि त्यानंतर ‘सुरक्षा निरीक्षक’ पदावर पदोन्नती दिली जात होती. मात्र, नव्या निर्णयानुसार ‘सुरक्षा सुपरवायझर’ आणि ‘सुरक्षा निरीक्षक’ ही दोन्ही पदे एकत्र करून ‘सुरक्षा निरीक्षक’ हे एकच पद कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पात्र सुरक्षा रखवालदारांना थेट सुरक्षा निरीक्षक पदावर पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा होणार(Security Inspector Promotion) आहे.
याशिवाय बैठकीत शहरातील होर्डिंग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट, महापालिकेच्या महसूलवाढीसाठी आवश्यक उपाययोजना तसेच पालिकेच्या ताब्यातील उपलब्ध जागांच्या विकासाबाबतही सविस्तर चर्चा करण्यात (Security Inspector Promotion) आली.
