चिखली : महाराष्ट्र विकास केंद्र आयोजित ज्ञानसमृद्धी व्याख्यानमालेत जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांनी युवकांनी बहुआयामी, जागरूक आणि अष्टपैलू बनणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कॉनक्वेस्ट कॉलेज येथे आयोजित व्याख्यानमालेत ते “समर्थ भारत आणि आजचा युवक” या विषयावर बोलत (Youth Development)होते.
घावटे म्हणाले, आज ज्ञान-विज्ञानाची अनेक क्षेत्रे युवकांसमोर खुली आहेत. शिक्षणाच्या परिघाबाहेरील ज्ञानामुळे व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. राष्ट्रप्रेमी, समाजाभिमुख आणि कार्यप्रवण युवकच देशाचे उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. युवकांनी व्यसनाधीनता व समाजविघातक प्रवृत्तींपासून दूर राहून कुटुंब व समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी (Youth Development)केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जलतज्ञ अनिल पाटील होते. प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप कदम यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. अमोल कवडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. वैभव पताळे यांनी मानले. व्याख्यानानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शंकानिरसन (Youth Development)केले.
