पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने (BJP) शिस्तभंग व चुकीच्या प्रचाराविरोधात कठोर भूमिका घेत प्रभाग क्रमांक १५ मधील चेतन बेंद्रे आणि समीर जावळकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षाच्या अधिकृत निर्णयाविरोधात जाऊन दुसऱ्या पक्षाची उमेदवारी स्वीकारणे तसेच भाजपच्या नावावर खोटा व दिशाभूल करणारा प्रचार केल्याने ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) सिताराम काटे(BJP Disciplinary Action) यांनी दिली.
चेतन बेंद्रे व समीर जावळकर हे दोघेही प्रभाग क्रमांक १५ मधून भाजपतर्फे इच्छुक उमेदवार होते. मात्र, पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केल्यानंतरही पक्षादेशानुसार माघार न घेता त्यांनी स्थानिक नेतृत्वाच्या निर्णयाच्या विरोधात जाऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आणि त्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल(BJP Disciplinary Action) केला.
दरम्यान, निवडणूक प्रचारादरम्यान दोघांकडून भारतीय जनता पक्षाच्या नावाचा वापर करून प्रचार केला जात असल्याचे तसेच भाजप–शिवसेना युती असल्याचा खोटा प्रचार केला जात असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले होते. या गंभीर बाबीची दखल घेत भाजपने तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करत दोघांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले असून, त्यांच्याकडे असलेली कोणतीही संघटनात्मक पदेही कायमस्वरूपी रद्द करण्यात आली आहेत. नोटीस निर्गमित झाल्यापासून हा निर्णय तात्काळ लागू असल्याचे पक्षाने(BJP Disciplinary Action) स्पष्ट केले आहे.
भाजपच्या वतीने हेही स्पष्ट करण्यात आले आहे की, पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पक्ष ही निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढवीत असून शिवसेनेशी कोणत्याही प्रकारची युती नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवा अथवा अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले(BJP Disciplinary Action)आहे.
प्रभाग क्रमांक १५ मध्ये शैलजाताई मोरे, शर्मिला बाबर, राजू मिसाळ आणि अमित गावडे हेच भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार असून, या चौघांचे अधिकृत निवडणूक चिन्ह ‘कमळ’ हेच असल्याचे भाजपने ठामपणे जाहीर केले (BJP Disciplinary Action)आहे.
