पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड शहरात यंदा उत्साह, संस्कृती आणि खाद्यपदार्थांचा अनोखा संगम अनुभवायला मिळणार आहे. महिलांच्या आनंद, आत्मविश्वास आणि सक्षमीकरणाला समर्पित “महिला आनंदोत्सव २०२६” हा दोन दिवसीय भव्य महोत्सव १४ आणि १५ मार्च रोजी निगडी प्राधिकरण येथील ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या मनोहर वाढोकर सभागृहात आयोजित करण्यात आला (Women Festival) आहे.
MyPCMC.Global च्या वतीने आणि विविध संस्थांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य स्पर्धा, संगीत मैफिली, खरेदीचे स्टॉल्स आणि खाद्यसंस्कृतीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच भव्य ‘मिसळ महोत्सव’ आयोजित करण्यात येत असून तो या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. या महोत्सवाला सुमारे पाच हजारांहून अधिक महिलांचा सहभाग अपेक्षित असल्याची माहिती आयोजकांनी (Women Festival)दिली.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक अनुप मोरे युवा फाउंडेशनचे संस्थापक व भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी प्रदेशाध्यक्ष अनुप अविनाश मोरे तसेच माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेविका सौ. शैलजाताई अविनाश मोरे (Women Festival) आहेत.
पिंपरी-चिंचवडमध्ये प्रथमच भव्य ‘मिसळ महोत्सव’
महोत्सवातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणार आहे तो म्हणजे भव्य मिसळ महोत्सव. महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ असलेल्या मिसळीच्या विविध चवी येथे एकाच ठिकाणी अनुभवता येणार (Women Festival)आहेत.
कोल्हापुरी झणझणीत तडका, पुणेरी मिसळ, नाशिकची खास चव अशा विविध भागांतील मिसळींसह मराठमोळ्या खाद्यपदार्थांचे अनेक स्टॉल्स येथे उभारले जाणार आहेत. त्यामुळे मिसळप्रेमींसाठी हा महोत्सव खास आकर्षण ठरणार (Women Festival)आहे.
महिला दिनाचा उत्सव… पण सर्वांसाठी खुला
महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. महिला, पुरुष, कुटुंबीय आणि तरुण मंडळी अशा सर्वांनाच या कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. त्यामुळे कुटुंबासोबत विकेंड आनंदात साजरा करण्याची ही एक उत्तम संधी ठरणार (Women Festival) आहे.
नृत्य स्पर्धा आणि बक्षिसांची रेलचेल
महोत्सवात विविध वयोगटांसाठी भव्य नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.७ ते १५ वर्षे व खुला गट अशा सोलो डान्स स्पर्धा, तसेच ग्रुप डान्स स्पर्धा होणार असून विजेत्यांना रोख पारितोषिके आणि सन्मानचिन्हे प्रदान करण्यात येणार आहेत.याशिवाय ज्येष्ठ नागरिकांसाठी गवळण, भारूड आणि इतर सांस्कृतिक सादरीकरणांच्या विशेष स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या (Women Festival)आहेत.

‘स्वर-सखी’ कार्यक्रमातून दिग्गज गायिकांना मानवंदना
१५ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता “स्वर-सखी – ‘ती’चा सूर, ‘ती’चे गाणे” हा विशेष संगीत कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या कार्यक्रमातून लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, माणिक वर्मा, सुमन कल्याणपूर आणि अनुराधा पौडवाल या दिग्गज गायिकांच्या गाण्यांना मानवंदना अर्पण करण्यात येणार (Women Festival) आहे.
तळेगाव दाभाडे येथील विकेंड युफनी संस्थेमार्फत सादर होणाऱ्या या कार्यक्रमात संपदा थिटे, लीना परगी, निशा अभ्यंकर, श्रावणी कुलकर्णी, स्वरदा कुलकर्णी, पूर्वा करंदीकर आणि रश्मी कुलकर्णी या गायिका गीत सुमनांजली अर्पण करणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात साथ-संगत देखील महिला वादकांकडूनच सादर केली जाणार (Women Festival)आहे.
महिलांसाठी खरेदी व मनोरंजनाची मेजवानी
महोत्सवात महिलांसाठी खरेदीचे स्टॉल्स, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रम असणार आहेत. त्यामुळे हा महोत्सव महिलांच्या सक्षमीकरणासोबतच आनंद आणि उत्साहाचा रंगतदार उत्सव ठरणार (Women Festival)आहे.
मान्यवरांचे सहकार्य
या महोत्सवाला आमदार उमा खापरे, पिंपरी-चिंचवड प्राधिकरण मंडळाचे अध्यक्ष जयदीप खापरे, नगरसेवक अमित गावडे यांचे सहकार्य लाभले आहे. तसेच काव्या एडवांस्ड स्किन अँड हेअर ग्लोरी क्लिनिक, पॅन ऑर्थो हॉस्पिटल (निगडी प्राधिकरण), व्हिजन हॉलिडेजच्या प्रीतमराणी शिंदे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे शहराध्यक्ष सचिन कुलकर्णी, फोर्टी स्पेशल, रॉयल क्लब ऑफ प्राधिकरण आणि स्पेशल फोर्टी ग्रुप यांचाही सहभाग (Women Festival)आहे.
संयोजन
या महोत्सवाचे संयोजन MyPCMC.Global चे संस्थापक व मुख्य संपादक विवेक इनामदार, पुणे इन्फोमीडियाच्या संचालिका आकांक्षा इनामदार-जाधव, आकाश जाधव, महोत्सवाचे मुख्य समन्वयक डॉ. श्रीकृष्ण जोशी, मुख्य संयोजिका शर्मिला महाजन तसेच स्पर्धा प्रमुख ज्योती कानेटकर यांनी केले (Women Festival) आहे.
महिलांनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महिला आनंदोत्सव, मिसळ महोत्सव आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले (Women Festival)आहे.
संपर्क :
शर्मिला महाजन – ९८२२८७०११८
ज्योती कानेटकर – ७७६९९८१५५७
“महिला आनंदोत्सव २०२६ – नारीशक्तीचा उत्सव, संस्कृतीचा जल्लोष आणि चवीचा (Women Festival)महोत्सव!”
