पिंपरी-चिंचवड :पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या येऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची भव्य जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा शनिवार, दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजता आकुर्डी येथील श्री विठ्ठल मंदिर परिसरात होणार (Devendra Fadnavis Rally) आहे.
महापालिका निवडणुकीत भाजप विकासाचा मुद्दा घेऊन जनतेसमोर जात असून, या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही सभा अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. राज्यात आणि देशात राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांचा लेखाजोखा मांडत, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपची भूमिका या सभेतून मांडली जाणार (Devendra Fadnavis Rally)आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात आलेल्या पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, पाणीपुरवठा, गृहनिर्माण योजना तसेच महिलांसाठी आणि युवकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांचा उल्लेख या सभेत अपेक्षित आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या पुढील विकासाचा रोडमॅपही यावेळी मांडण्यात येणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात (Devendra Fadnavis Rally) आले.
या जाहीर सभेसाठी पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह पाहायला मिळत असून, हजारोच्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री. अनुप मोरे यांनी केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पिंपरी-चिंचवड शहरात आगमनानिमित्त त्यांचे सहर्ष स्वागत करण्यात येणार असून, ही सभा भाजपच्या प्रचाराला नवे बळ देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत (Devendra Fadnavis Rally) आहे.
महापालिका निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळावे यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने या सभेत सहभागी होणार असल्याचे चित्र (Devendra Fadnavis Rally) आहे.


