चिंचवड (संभाजीनगर) : संभाजीनगर येथील सिद्धिविनायक मंदिरात महाराष्ट्रातील नामवंत किर्तनकारांच्या उपस्थितीत भव्य कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिद्धिविनायक मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच गणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर या धार्मिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षी उत्सवाचे हे तिसावे वर्ष (Religious Events PCMC)आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान, स्वातंत्र्यवीर सावरकर मित्र मंडळ, सिद्धिविनायक ज्येष्ठ नागरिक संघ, सावरकर महिला मंडळ आदी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव साजरा केला जात आहे. या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले (Religious Events PCMC)आहे.
या कीर्तन महोत्सवात आळंदी संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. पुरुषोत्तम महाराज पाटील, वाणीभूषण प्रमोद महाराज जगताप, संतसेवक श्रीकांत महाराज गागरे, सौ. ऋतुजा झेंडे-घिसरे, भागवताचार्य तुकाराम शास्त्री मुंडे आदी नामवंत कीर्तनकार आपल्या कीर्तनसेवेचा लाभ देणार(Religious Events PCMC) आहेत.
महोत्सवाच्या कालावधीत दररोज विविध संस्थांच्या भजनी मंडळांच्या वतीने भजनाचे कार्यक्रम होणार असून, दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण व सायंकाळी हरिपाठाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले (Religious Events PCMC)आहे.
