पिंपरी, दि. १९ जून : पिंपरी-चिंचवड शहराचा भविष्यातील पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पवना धरण ते निगडी बंद जलवाहिनी प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शेतकरी, भूमिपुत्र आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन हा प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यावर बैठकीत भर देण्यात (Pcmc Water Project) आला.
बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, उपसंचालक किशोर गोखले, मुख्य अभियंता प्रमोद ओव्हाळ, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, उषा विश्वासराव, हर्षद घुले यांच्यासह संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित(Pcmc Water Project) होते.
बैठकीत जलवाहिनीच्या मार्गातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून उर्वरित भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. विविध विभागांनी परस्पर समन्वय साधून प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करावे, असेही स्पष्ट करण्यात आले. पाणी हा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित अत्यंत महत्त्वाचा विषय असल्याने प्रशासकीय विलंब टाळण्यावर विशेष भर देण्यात (Pcmc Water Project)आला.
पवना धरणातून निगडी येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंद जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, वर्ष २०५५ पर्यंतची लोकसंख्या आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन ७५० दशलक्ष लिटर प्रतिदिन (एमएलडी) क्षमतेचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाला आयआयटी मुंबईची तांत्रिक मान्यता मिळाली असून त्याची अंदाजित किंमत ८९४.६७ कोटी रुपये (Pcmc Water Project)आहे.
प्रकल्पांतर्गत आधुनिक हेडवर्क्स, जॅकवेल, उच्च क्षमतेचे पंप, दुहेरी गुरुत्वाकर्षण जलवाहिनी, रेल्वे मार्ग आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाखाली टनेल बोरिंग तंत्रज्ञान तसेच संपूर्ण यंत्रणेच्या देखरेखीसाठी अत्याधुनिक SCADA प्रणाली उभारण्यात येणार (Pcmc Water Project)आहे.
एकूण ३४.८५ किलोमीटर जलवाहिनी मार्गापैकी ३१.४२ किलोमीटरचे भूसंपादन पूर्ण झाले असून उर्वरित ३.४३ किलोमीटर क्षेत्रातील प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया लवकर पूर्ण करून प्रकल्पाच्या कामाला अधिक गती देण्याचे नियोजन करण्यात आले (Pcmc Water Project)आहे.
आमदार महेश लांडगे म्हणाले, “पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी भाजपा महायुती सरकार कटिबद्ध आहे. सरकारने या प्रकल्पावरील ‘जैसे थे’ आदेश रद्द करून अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामावरील स्थगिती उठवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित भूसंपादन, तांत्रिक अडचणी आणि प्रशासकीय प्रक्रिया वेळेत पूर्ण करून नागरिकांना शुद्ध, सुरक्षित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे आणि शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे हेच आमचे ध्येय (Pcmc Water Project)आहे.”
