पिंपरी : “आपल्या विचारांवर ठाम राहिल्यास अपेक्षित फलप्राप्ती निश्चित होते,” असे प्रतिपादन समुपदेशिका अमृता चांदोरकर यांनी केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेतील ‘जे मागाल ते मिळेल : अर्थात मनातील लहरी कशा काम करतात…’ या विषयावरील पहिल्या व्याख्यानात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम चापेकर स्मारक उद्यान, चिंचवडगाव येथे पार (jijavu Vyakhyanmala )पडला.
उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. यावेळी प्रभावती इंदलकर व्यासपीठावर उपस्थित होत्या. तसेच राजाभाऊ गोलांडे, विपुल नेवाळे, सुहास पोफळे, महेश गावडे, नवनाथ सरडे आणि धीरज गुत्ते यांची उपस्थिती( Jijavu Vyakhyanmala )होती.
शर्मिला बाबर यांनी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या कार्याबद्दल गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे कौतुक केले. डॉ. सिद्धी नेवाळे यांनी प्रास्ताविकात मंडळाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तर सुजाता पोफळे यांनी व्याख्यात्या अमृता चांदोरकर यांचा परिचय करून (Jijavu Vyakhyanmala) दिला.
चांदोरकर म्हणाल्या, “आपले विचार, भावना आणि कृती यांचा जीवनावर मोठा प्रभाव असतो. स्पष्ट उद्दिष्ट ठरवून सातत्य, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर यश निश्चित मिळते.” त्यांनी विविध उदाहरणांसह विषय स्पष्ट केला व श्रोत्यांच्या प्रश्नांची उत्तरे (Jijavu Vyakhyanmala)दिली.
कार्यक्रमाचा समारोप सामुदायिक ध्यानधारणेच्या प्रात्यक्षिकाने झाला. सुनीता वडगावकर यांनी सूत्रसंचालन, तर हेमा सायकर यांनी आभार प्रदर्शन (Jijavu Vyakhyanmala) केले.
