पिंपरी, दि. २६प्रतिनिधी : अखिल भारतीय नाट्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने कलाकार कट्टा – पुष्प ३ हा कार्यक्रम चिंचवड येथील पंडित पद्माकर सभागृहात उत्साहात पार (Art and Culture )पडला.
या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक मा. भाऊसाहेब भोईर यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले,“कुठलीतरी कला माणसाला यायलाच हवी. किमान वाचनकला किंवा श्रवणकला तरी असावी. कुठलीही कला नसलेला माणूस दगडासारखा असतो. कला अनुभवणे हे माणसाच्या आयुष्यातील चार्जिंग आहे. आज राजकारणात साहित्याची आणि कलेची जाण कमी होत चालली असल्याने सामाजिक भानही कमी झाले आहे. कला ही अशी शक्ती आहे की ती संकटातही संधी शोधायला( Art and Culture) शिकवते.”
कार्यक्रमात फिरोज मुजावर यांनी गणेश वंदनेचे नृत्य सादर केले. चैतन्य काजुळकर व सहकाऱ्यांनी शाहिरी सादरीकरण केले. तुकाराम पाटील यांनी कथा कथन केले, तर शोभा जोशी व सुप्रिया लिमये यांनी कविता सादर केल्या. राजेंद्र पगारे आणि नंदकुमार कांबळे यांनी कराओके गीत सादर केले. तसेच आसाराम कसबे यांनी संबळ या वाद्याची ओळख करून देत प्रभावी सादरीकरण ( Art and Culture)केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले. कलाकार कट्ट्याचे नियोजन सुहास जोशी, राज आहेरराव व अश्विनी कुलकर्णी यांनी ( Art and Culture)केले.
प्रस्तावनेत किरण येवलेकर यांनी, “या शहरातील जास्तीत जास्त कलाकारांनी या कट्यात सहभागी व्हावे. सर्वांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाईल,” असे ( Art and Culture)सांगितले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाहीर प्रकाश ढवळे यांनी उपस्थितांचे( Art and Culture) आभार मानले.
