निगडी प्रतिनिधी :निगडी येथील श्री विहार, श्री नगरी, सिद्धिविनायक नगरी आणि समर्थ नगरी रहिवासी मंडळाच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. अजितदादांच्या आकस्मिक आणि दुर्दैवी अपघाती निधनाने अवघा महाराष्ट्र शोकमग्न झाला असून ही हानी भरून न निघणारी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत (Ajit Pawar Tribute)आहे.

रोखठोक निर्णयक्षमता, प्रशासनावर असलेली मजबूत पकड आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी अहोरात्र झटणारे नेतृत्व अशी अजितदादा पवार यांची ओळख होती. विशेषतः पिंपरी-चिंचवड शहराशी त्यांचे नाते केवळ राजकीय नव्हते, तर ते जिव्हाळ्याचे होते. या शहरातील विकासकामे, उद्योग, रोजगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांमध्ये दादांची भूमिका नेहमीच निर्णायक राहिली. त्यामुळेच दादांच्या जाण्याने पिंपरी-चिंचवड शहर अक्षरशः पोरके झाले असून, शहरवासीयांना आजही त्या दुःखाचा आवर घालणे कठीण जात (Ajit Pawar Tribute)आहे.

या पार्श्वभूमीवर निगडी परिसरातील श्री विहार येथे श्री विहार, सिद्धिविनायक नगरी, श्री नगरी आणि समर्थ नगरी येथील रहिवासी मंडळींच्या वतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. या शोकसभेला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच लहान मुलांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. संपूर्ण परिसरात शोकाकुल वातावरण पसरले होते. उपस्थित सर्व नागरिकांनी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण (Ajit Pawar Tribute) केली.

यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत दादांच्या आठवणींना उजाळा दिला. “दादा म्हणजे निर्णय, धाडस आणि काम. शब्द कमी आणि काम जास्त हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य होते,” असे भावनिक उद्गार यावेळी उपस्थित नागरिकांच्या तोंडून उमटले. काही नागरिकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले होते, तर अनेकांनी दादांनी केलेल्या विकासकामांची आणि मदतीची उदाहरणे (Ajit Pawar Tribute)सांगितली.
या शोकसभेला मंडळाचे अध्यक्ष प्रा. सूर्यकांत पवार, अनिल लोखंडे, भूषण पंचवाडकर, नामदेव हांडे, प्रमोद बावणकर, किशोर गाथाडे, तानाजी काळभोर, विश्वास गांगुर्डे, नितांत सोनवणे, राजेंद्र पाटील, हरिभाऊ देशमुख, दिलीप निकम, संदीप ढमढेरे, येतराज काका, शशिकांत कुंभार, स्वाती इंजे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी एकमताने स्व. अजितदादा पवार यांचे कार्य, नेतृत्व आणि सामान्य माणसाशी असलेले नाते कधीही विसरता येणार नाही, अशी भावना व्यक्त(Ajit Pawar Tribute) केली.
शोकसभेचा समारोप ‘दादा अमर रहे’च्या घोषणांनी, नतमस्तक मस्तकांनी आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी करण्यात आला. स्व. अजितदादा पवार यांच्या आठवणी, त्यांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेला विश्वास कायम पिंपरी-चिंचवडकरांच्या मनात जिवंत राहील, अशी भावना यावेळी सर्वांनी व्यक्त (Ajit Pawar Tribute)केली.
