(निगडी, प्रतिनिधी ): ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्राच्या वतीने श्री गणेशप्रतिष्ठापना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी १.३० ते ५ या वेळेत ज्ञान प्रबोधिनी निगडी केंद्र, राष्ट्रीय सौ. भाद्रपद ११, शके १९४८ येथे ही कार्यशाळा होणार (Ganesh Festival JNPV) आहे.
या कार्यशाळेत श्री गणेश प्रतिष्ठापना, दैनंदिन पूजा, पंचोपचार व अभिषेक तसेच उत्तरपूजा याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी होणाऱ्या भाविकांना गणेश पूजनाची पोथीही कार्यशाळेत देण्यात येणार(Ganesh Festival JNPV) आहे.
ही कार्यशाळा १८ वर्षांवरील सर्वांसाठी खुली असून, देणगी मूल्य १०० रुपये आहे. कार्यशाळेला येताना रोख रक्कम जमा करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. तसेच सहभागी होणाऱ्यांनी लेखन साहित्य सोबत आणावे, असे कळविण्यात आले (Ganesh Festival JNPV) आहे.
अधिक माहितीसाठी अथर्व दातार यांच्याशी संपर्क साधता (Ganesh Festival JNPV) येईल.

