पिंपरी-चिंचवड : अभिनय प्रशिक्षण शिबिरातील सहभागी कलाकारांनी सादर केलेल्या नाट्यकृतींचा बहारदार कार्यक्रम “नाट्य जल्लोष” रविवारी, दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम निगडी येथील भरतमुनी रंगघन, कामायनी शाळा, चिंतामणी मंदिराशेजारी, सेक्टर २४, प्राधिकरण येथे रंगणार (Natya Jallosh)आहे.
११ ते २५ एप्रिल दरम्यान पार पडलेल्या अभिनय प्रशिक्षण शिबिरातील शिबिरार्थींनी तयार केलेल्या विविध कलाविष्कारांचे सादरीकरण या कार्यक्रमात होणार आहे. प्रेक्षकांना तीन नाटिका, २० शिबिरार्थींची एकपात्री सादरीकरणे, नृत्याविष्कार तसेच प्रमाणपत्र वितरण सोहळा पाहण्याची संधी मिळणार (Natya Jallosh) आहे.
कार्यक्रमात “बाईक ट्रिप टू लडाख”, “चार्वी ची बार्बी” आणि “गड्या आपला गांवच बरा” या नाटिका सादर केल्या जाणार आहेत. याशिवाय नवोदित कलाकारांची एकपात्री सादरीकरणे आणि नृत्याविष्कारही आकर्षण ठरणार (Natya Jallosh)आहेत.
या सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून सुप्रसिद्ध सिने-नाट्य अभिनेत्री मृणमयी गोंधळेकर उपस्थित राहणार आहेत. त्यांनी “ढोलकीच्या तालावर” या कार्यक्रमाचे विजेतेपद पटकावले असून “डांस महाराष्ट्र डांस”मध्ये उपविजेतेपद मिळवले आहे. तसेच त्यांनी विविध मालिका आणि नाटकांतही भूमिका साकारल्या (Natya Jallosh)आहेत.
तसेच डॉ. संजीवकुमार पाटील हे प्रमुख उपस्थित राहणार असून ते शिबिर मार्गदर्शक, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार (Natya Jallosh)आहे.
कार्यक्रमासाठी देणगी प्रवेशिका रु. १०० ठेवण्यात आली असून त्या कार्यक्रमाच्या एक तास आधी नाट्यगृहावर उपलब्ध असतील. कला रसिकांनी या नाट्य सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले (Natya Jallosh)आहे.
