प्रतिनिधी:श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी यांच्या विश्वस्त मंडळाची बैठक आळंदी येथे दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाली.या बैठकीत सन २०२६ या वर्षासाठी प्रमुख विश्वस्त म्हणून डॉ. भावार्थ देखणे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. या वेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ तसेच सर्व विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम दादा पाटील आणि अॅड. रोहिणी पवार उपस्थित (Dr Bhavarth Dekhane) होते.
डॉ. भावार्थ देखणे हे उच्च शिक्षित असून त्यांनी अमेरिकेत शिक्षण घेतले आहे. त्यांच्याकडे तीन पदव्युत्तर पदव्या असून व्यवस्थापन विषयात पीएचडी प्राप्त केली आहे. सध्या ते बी. व्ही. जी. इंडिया लिमिटेड या कंपनीमध्ये एच. आर. हेड या पदावर कार्यरत आहेत.याशिवाय डॉ. भावार्थ देखणे हे प्रसिद्ध भारुडकार, कीर्तनकार, व्याख्याते, निरुपणकार आणि प्रवचनकार म्हणूनही ओळखले जातात. त्यांनी महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही इंग्रजी भाषेत कीर्तन व भारुडांचे सादरीकरण केले (Dr Bhavarth Dekhane)आहे.
सन २०२५ च्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात त्यांनी पालखी सोहळा प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळली होती. संस्थानच्या व्यवस्थापनात त्यांच्या अनुभवाचा निश्चितच लाभ होणार असल्याचे यावेळी सांगण्यात (Dr Bhavarth Dekhane) आले.
याबाबत माहिती देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी (Dr Bhavarth Dekhane)दिली.
