पिंपरी, दि. १८ एप्रिल २०२६ — पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘सामाजिक समता सप्ताह’ आणि ‘विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत पिंपरी येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची भव्य मेजवानी रंगली. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात (Dr. Babasaheb Ambedkar) आले.
गुरुवारी (दि. १६) पिंपरीतील एच. ए. मैदानावर ‘महासूर्य’ या भव्य महानाट्याचे सादरीकरण करण्यात आले. १०० हून अधिक कलाकारांच्या सहभागातून साकारलेल्या या महानाट्याने सामाजिक समतेचा प्रभावी संदेश (Dr. Babasaheb Ambedkar) दिला.
या महानाट्यात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील महत्त्वपूर्ण टप्प्यांचे जिवंत चित्रण करण्यात आले. बालपणापासून शिक्षणासाठीचा संघर्ष, अन्यायाविरुद्धची लढाई, परदेशातील शिक्षणप्रवास, ‘मूकनायक’ची स्थापना, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, पूना करार तसेच रमाबाई आंबेडकर यांच्यासोबतचा सहजीवन प्रवास हृदयस्पर्शी पद्धतीने सादर करण्यात(Dr. Babasaheb Ambedkar) आला.
सम्यक थिएटर, नागपूर प्रस्तुत या महानाट्याचे लेखन व दिग्दर्शन प्रा. सुनील रामटेके यांनी केले. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांच्या आवाजातील निवेदनामुळे कार्यक्रमाला विशेष प्रभावीपणा लाभला. उत्कृष्ट प्रकाशयोजना, ध्वनी, नेपथ्य व वेशभूषेमुळे सादरीकरण अधिक भव्य(Dr. Babasaheb Ambedkar) ठरले.
याच पर्वात ‘ट्रिब्युट टू महात्मा फुले अँड डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑन व्हील्स’ हा विशेष कार्यक्रमही सादर करण्यात आला. राष्ट्रपती पुरस्कार विजेते डॉ. सय्यद पाशा आणि दिव्यांग कलाकारांनी नृत्य व नाट्याद्वारे सामाजिक जिद्द, आत्मविश्वास आणि समतेचा संदेश (Dr. Babasaheb Ambedkar) दिला.
तसेच ‘शौर्यगाथा महामानवांची’ या संगीतमय कार्यक्रमातून महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांच्या कार्याचा गौरवपूर्ण इतिहास उलगडण्यात आला. आंबेडकरवादी मंच, नांदेड यांच्या वतीने ‘निळी टोपी’ या नाटकाचेही प्रभावी सादरीकरण (Dr. Babasaheb Ambedkar) झाले.
या सर्व कार्यक्रमांना हजारो नागरिकांची उपस्थिती लाभली. इतिहासाचा जिवंत अनुभव घेत सामाजिक समतेच्या विचारांशी नागरिकांनी नव्याने नाळ (Dr. Babasaheb Ambedkar) जोडली.
