खरेतर सिनेमा समाजजीवनाचे प्रतिबिंब असते. सामाजिक जीवनात झालेले बदल अथवा होऊ घातलेले बदल याचे संमिश्रण सिनेमा आपल्याला कथेच्या माध्यमातून दाखवतो.दोन घटका मनोरंजन म्हणूनच चित्रपट पाहायला येणारे सिनेरसिक डोळ्यासमोर ठेवून चित्रपट बनत असले, तरी असंख्य चित्रपटातून समाजातील वेगवेगळ्या समस्येवर भाष्य होत (Guide movie ) असते.
परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे. पण होणारे परिवर्तन सामाजिक अंगाला रुचेल की नाही? याचा अंदाज सिनेमा निर्मात्यांना असतोच असे नाही. मग कधी कधी असा जुगार धैर्याने चित्रपट निर्माते खेळतात. यश-अपयश याच्या पलीकडे (Guide movie) जाऊन…
१९६५ साली देवानंद यांचा नवकेतन फिल्म एंटरप्रायझेस या संस्थेच्या वतीने “गाईड” हा चित्रपट आला होता. देवानंद आणि वहिदा रेहमान यांच्या त्यात प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाची कथा आर. के. नारायण यांच्या “गाईड” या इंग्रजी नॉव्हेलवर आधारित होती. देवानंद यांचे बंधू विजय आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले(Guide movie) होते.
निर्माते देवानंद यांनी आर. के. नारायण यांनी लिहिलेली ही इंग्रजी कादंबरी वाचली आणि यावर चित्रपट बनविण्याचे ठरविले. आपल्या भावाने हा सिनेमा दिग्दर्शित करावा यासाठी भावाला गळ घातली. कलाकार निवडीपासून ते संगीतकार, गीतकार इत्यादी निवड करण्यात आली. कृष्णधवल चित्रपट या आधी देवानंद यांच्या नवकेतनने बनवले होते. पण “गाईड” चित्रपट रंगीत बनवायचे(Guide movie)ठरले.
देवानंद यांच्या आवडीचे संगीतकार एस. डी. बर्मन, गीतकार शैलेंद्र, गायक मोहम्मद रफी, लता मंगेशकर, किशोर कुमार यांनी चित्रपटातील गाण्यांकडे विशेष लक्ष (Guide movie) दिले.
चित्रपटाच्या भट्टीला यथायोग्य कलाकारांची निवड झाल्यावर चित्रपट निर्मितीला सुरुवात झाली. “गाईड” चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाने अनेक उच्चांक मोडले. चित्रपट रसिकांच्या पसंतीला हा चित्रपट आला. सात ते आठ फिल्मफेअर अवॉर्ड चित्रपटाने (Guide movie) पटकावले.
ही झाली या प्रसिद्ध “गाईड” चित्रपटाची पार्श्वभूमी
खरा प्रश्न असा आहे की, असं काय होतं या चित्रपटात?
बहोत कुछ (Guide movie) था…
अध्यात्म होते या चित्रपटात. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार या षड्रिपूंच्या प्रभावामुळे माणसाचे अध:पतन कसे होते? याचे अचूक दर्शन होते या (Guide movie) चित्रपटात.
साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला।
ठायीच मुराला अनुभव।।
याची जाणीव, नेणीव चित्रपटातील काही प्रसंग आपल्याला करून (Guide movie) देतात.
माणसाच्या मनातील बाह्यांग आणि अंतरंग याचा झोका पाहायला मिळतो
जाती न पूछो साधु की, पूछ लिजिये ज्ञान..
हे जरी खरे असले तरी साधूंमधील एकमेकांवरची कुरघोडी पाहायला मिळते।
बदलती सामाजिक स्थित्यंतरे याचा वेध हा चित्रपट (Guide movie) घेतो.
१९६५ साली स्त्री आणि पुरुष रिलेशनशिपमध्ये राहतात हे दाखविणे धाडसाचे होते. आज याचे कोणालाच विशेष काही वाटत नाही, पण त्या काळातील चित्रपटात असे दाखविले(Guide movie) गेले
पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या आधारावर माणूस जगत असतो. पाऊसच जर पडला नाही तर जीवांनी जगायचे कसे? मग लाखो हात जोडले जातात त्या ईश्वराकडे… आकाशाकडे (Guide movie) पाहून…
अनेक देवदेवतांना साकडे घातले जाते… नेत्रातील खाऱ्या पाण्याचा अभिषेक ईश्वराच्या मूर्तीवर आपोआप(Guide movie) होतो.
भीषण कोरडा दुष्काळ माणसाचा जीव अंतरबाह्य जाळतो. जलधारा बनून भगवंता तू आकाशातून जमिनीवर ये… ही करुण साद माणूस घालतो. ज्या ज्या देवांचा माणूस भक्त आहे त्या त्या देवांचे नाव घेऊन प्रार्थना करतो माणूस
कुणाची तरी आत्मपूर्ण प्रार्थना देव ऐकतो. तसा आपल्या सर्वांचा देव भावाचा भुकेला आहे. आणि मग पाऊस बनून देव येतो भेटायला माणसाला… त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन…
हेच सारे काही या चित्रपटात आहे बरे…
स्वतःच्या वेदना आणि दुःख सोबत घेऊन मजल-दरमजल करीत राजू गाईड हा तरुण साधूंच्या जथ्यासोबत एका गावात येतो. एका शिवालयाच्या जवळ थकून झोपतो. थंडी वाजू लागते त्याला. एक साधू ते पाहतो. त्याच्या अंगावर भगवी शाल पांघरून निघून (Guide movie) जातो.
दुसऱ्या दिवशी सकाळी गुरे राखणारा एक गुराखी राजू गाईडला पाहतो. हे कोणी तरी फार मोठे साधू आहेत असे त्याला वाटते. तो ही गोष्ट गावकऱ्यांना सांगतो. राजू गाईड सहज जे काही बोलतो त्याचे चांगले परिणाम गावकऱ्यांवर होतात आणि मग सारे गावकरी या राजू गाईडला श्रद्धेने भजू लागतात. त्याचे विचार ऐकण्यासाठी गर्दी करू (Guide movie) लागतात.
पाण्याविना पडलेल्या दुष्काळाच्या स्थितीत जर या महात्म्याने अन्न-पाणी त्याग करून आमरण उपोषण केले तर पाऊस नक्की पडेल ही भावना गावकऱ्यांची होते. राजू गाईडला आता ते ऐकावे लागते. मीडियातून, वृत्तपत्रातून बातम्या झळकतात. एक साधू पाऊस पडावा म्हणून आमरण उपोषणाला बसले आहेत. माणसांचे लोंढे त्या गावाच्या दिशेने चालू लागतात. राजू गाईड यांच्या आईला तसेच त्याची प्रेयसी रोझी उर्फ नलिनी हिला ही बातमी समजते. त्या देखील तिथे दाखल (Guide movie) होतात.
राजू गाईड यांच्या मनात द्वंद्व सुरू होते…
पळून जावे असे वाटते त्याला…
मग पुन्हा विचार येतो त्याच्या मनात. या गावकरी लोकांचे काय? यांचा तर जीवनावरचा, श्रद्धा आणि भक्तीवर असलेला विश्वास उडेल…
देवाच्या पुढे आलेला प्रसाद खाण्याची तीव्र इच्छा होते राजू गाईडला. तो मोह आवरतो।
अन्न नाही, पाणी नाही. राजू गाईड यांची प्रकृती ढासळते।
आता त्याचा आत्मा त्याच्याशी बोलू लागतो…
आत्म्याचे बोल चित्रपटात लेखकाने लिहिले आहेत।
आग में फेंक दो मैं जलूंगा नहीं…
तलवार से वार करो,
मैं कटूंगा नहीं…
तुम अहंकार हो…
तुमको मरना होगा…
मैं आत्मा हूँ… अमर हूँ…
मौत का खयाल है जैसे जिंदगी का खयाल है…
ना सुख है, ना दुख है, ना दिन है, ना दुनिया…
ना इंसान, ना भगवान…
सिर्फ मैं हूँ…
सिर्फ मैं हूँ…
सिर्फ मैं…
आत्मा बोलतो त्या मरणासक्त देहाशी।
राजू गाईड देह सोडतो…
आणि मग चित्रपट कितीतरी उंचीवर जाऊन पोहोचतो।
विजांचा कडकडाट होतो. पाऊस पडू लागतो. माणसे आनंदी होतात…
या चित्रपटाची कथा संपूर्ण सांगावी वाटली नाही. यासाठी वेळ मिळाला की हा चित्रपट अवश्य पहा यू-ट्यूबवर।
या चित्रपटातील गाणी अजरामर आहेत।
१) वहा कौन है तेरा
मुसाफिर जायेगा कहा.. (गायक आणि संगीत एस. डी. बर्मन)
२) तेरे मेरे सपने अब एक रंग है
३) काटो से खींच के ये आंचल, तोड़ के बंधन बांधे पायल..
४) गाता रहे मेरा दिल, तू ही मेरी मंजिल..
५) मोसे छल किये जा.. हाय रे हाय देखो सैयाँ बेईमान..
६) क्या से क्या हो गया बेवफा तेरे प्यार में..
७) पिया तोसे नैना लागे रे…
८) दिन ढल जाये हाय, रात ना जाय, तू तो ना आये तेरी याद सताये..
चला भेटू या पुढच्या (Guide movie) शुक्रवारी…
लेखन – सुरेश कंक

