भरधाव वेगात येणाऱ्या एका दुचाकीने दुसऱ्या दुचाकीला कट देत जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले. ही घटना चिंचवड येथील चापेकर चौकात घडली. या प्रकरणात जखमी झालेल्या २७ वर्षीय तरुणाने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संबंधित दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल (Crime News) करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रासह दुचाकीवरून जात असताना आरोपीने चालविलेल्या दुचाकीने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात दोघेजण जखमी झाले असून दुचाकीचेही नुकसान झाले आहे. या घटनेचा(Crime News) तपास चिंचवड पोलीस करत आहेत.
हिंजवडीत पिस्तुलासह तरुणास अटक
हिंजवडी परिसरात पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली. इस्माईल उर्फ नादील करीम शेख (वय २३, रा. कोयतेवस्ती, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई ओमप्रकाश श्रीरंग कांबळे यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद (Crime News) दिली आहे.
माहितीनुसार, इस्माईल हा परिसरात संशयास्पदरित्या फिरत असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे ३५ हजार रुपयांचे एक गावठी पिस्तुल व एक हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे आढळली. या प्रकरणाचा तपास हिंजवडी (Crime News) पोलीस करत आहेत.
