चिंचवड, ता. ०४ : पिंपरी-चिंचवडमधील नामांकित कमला एज्युकेशन सोसायटी संचलित प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत आपली शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. विविध शाखांमधील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत महाविद्यालयाचा गौरव (Pratibha Junior College) वाढवला.
विज्ञान शाखेत कु. मिहीका आठल्ये हिने ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. कु. आर्या कुलकर्णी (९३%) हिने द्वितीय, तर कुमार कुशल तशीलदार (९२.३३%) याने तृतीय क्रमांक मिळवला.
वाणिज्य शाखेत कुमार हशीर अत्तार (९४.८४%) प्रथम, कु. श्रावणी राजे शिर्के (९३.८३%) द्वितीय, तर कुमार हेमंत चौधरी (९३.६७%) तृतीय (Pratibha Junior College)ठरला.
कला शाखेत कु. आस्था शहा (९०.६७%) प्रथम, कु. मेधा भट (८९%) द्वितीय, तर कुमार जय पणमंद (८५%) तृतीय (Pratibha Junior College)आला.
विशेष गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये सुचिर देशमुख (गणित), मिहीका आठल्ये (गणित व जर्मन), हेमंत चौधरी (अकाउंट, आयटी व गणित), तसेच हशीर अत्तार, चैतन्य दातीर आणि सुहानी पांचाळ (अकाउंट) यांनी संबंधित विषयांमध्ये शंभर पैकी शंभर गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी (Pratibha Junior College)केली.
महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. वनिता कुऱ्हाडे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे, पालकांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन करत, “विद्यार्थ्यांचे सातत्यपूर्ण परिश्रम आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन यामुळेच हे यश शक्य झाले. भविष्यातही ही उत्कृष्ट परंपरा कायम राखण्याचा आमचा प्रयत्न राहील,” असे (Pratibha Junior College)सांगितले.
विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय पालक, शिक्षक आणि महाविद्यालयातील सकारात्मक वातावरणाला दिले. निकालानंतर परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले(Pratibha Junior College) आहे.
कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया तसेच सर्व प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा (Pratibha Junior College)दिल्या.
