निगडी :इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये रविवारी (३ मे) खेळल्या गेलेल्या सामन्यांत गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांनी दमदार कामगिरी करत महत्त्वाचे विजय (IPL 2026 GT, KKR)नोंदवले.
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या ४६व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्सवर ४ गडी राखून मात केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने २० षटकांत १६३ धावा केल्या. सूर्यांश शेडगे (५७) आणि मार्कस स्टोइनिस (४०) यांनी संघाला आधार दिला.
गुजरातकडून जेसन होल्डरने भेदक गोलंदाजी करत ४ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात गुजरातने १९.५ षटकांत १६७/६ धावा करत सामना जिंकला आणि सलग तिसरा विजय (IPL 2026 GT, KKR) नोंदवला.
दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ७ गडी राखून पराभव केला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत १६९ धावा केल्या, ज्यात ट्रॅव्हिस हेडने ६१ धावांची खेळी (IPL 2026 GT, KKR)साकारली.
प्रत्युत्तरात कोलकात्याने १० चेंडू राखून १६९/३ धावा करत सहज विजय मिळवला. रिंकू सिंगने नाबाद २२ धावा करत विजयात महत्त्वाची भूमिका (IPL 2026 GT, KKR) बजावली.
या विजयासह कोलकाता संघाने सलग तिसरा विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने जोरदार पाऊल टाकले आहे. दुसरीकडे, पंजाब किंग्सला सलग दुसरा पराभव पत्करावा लागला असून गुणतालिकेतील त्यांचे अव्वल स्थान धोक्यात आले (IPL 2026 GT, KKR) आहे.
स्पर्धा जसजशी पुढे सरकत आहे, तसतशी प्लेऑफसाठीची चुरस अधिकच रंगतदार होताना दिसत (IPL 2026 GT, KKR)आहे.
