पिंपरी-चिंचवड : पुणे महानगरपालिकेतील ज्युनियर इंजिनिअर पदांच्या १६९ जागांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेतील ऑनलाइन परीक्षेच्या केंद्रांबाबत उमेदवारांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक उमेदवारांना नागपूर, अमरावती, नांदेड यांसारखी दूरची परीक्षा केंद्रे देण्यात आल्याने परीक्षा पुण्यातच घेण्याची मागणी करण्यात आली (Municipal Corporation Recruitment)आहे.
यासंदर्भात खासदार श्रीरंग बारणे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात २२, २३ आणि २९ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी पुणे व पिंपरी-चिंचवडमधील उमेदवारांना ५०० ते ९०० किलोमीटर दूर केंद्रे देणे अन्यायकारक असल्याचे म्हटले(Municipal Corporation Recruitment) आहे.
दूरच्या केंद्रांवर जाण्यासाठी प्रवास, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था यासाठी प्रत्येक उमेदवाराला मोठा खर्च करावा लागत असून अनेक उमेदवार हे गरीब व बेरोजगार कुटुंबातील असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अनेक उमेदवार परीक्षेला गैरहजर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली (Municipal Corporation Recruitment) आहे.
परीक्षा काही दिवस वाढवून पुण्यातच घेण्यात यावी किंवा गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना पुन्हा संधी देऊन त्यांची परीक्षा पुण्यात आयोजित करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली (Municipal Corporation Recruitment)आहे.
हे निवेदन प्रकाश जाधव, मारुती भापकर, आबासाहेब ढवळे, सतीश काळे, ब्रह्मानंद जाधव आणि प्रसाद दौंडकर यांनी (Municipal Corporation Recruitment)दिले.
