पिंपरी : इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने वाई येथील प्रज्ञा पाठशाळा, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ आणि महाबळेश्वरजवळील पुस्तकांचे गाव भिलार येथे नुकतीच अभ्यास सहल आयोजित करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक आणि परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही सहल सहभागी सदस्यांसाठी प्रेरणादायी, ज्ञानवर्धक आणि अविस्मरणीय (Indrayani Sahitya Parishad) ठरली.
या एकदिवसीय अभ्यास सहलीत साहित्य, वाचनसंस्कृती, इतिहास आणि मराठी भाषेच्या जतन-संवर्धनावर उत्स्फूर्त चर्चा झाली. परिषदेचे सुमारे पंचवीस सदस्य या उपक्रमात सहभागी झाले होते. सरला रेवगडे, डॉ. सीमा काळभोर, परिषदेचे सचिव रामभाऊ सासवडे आणि माणिक सस्ते यांनी सहलीचे नियोजन(Indrayani Sahitya Parishad) केले.
सहलीची सुरुवात वाई येथील गणपती मंदिर दर्शनाने झाली. त्यानंतर तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा ऐतिहासिक वाडा पाहण्यात आला. पुढे सदस्यांनी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर मराठी भाषेचे संवर्धन आणि ज्ञानाचा अनमोल ठेवा जपण्यासाठी उभारण्यात आलेल्या या संस्थेचे कार्य पाहून सदस्यांनी समाधान व्यक्त(Indrayani Sahitya Parishad) केले.
अरुण बोऱ्हाडे यांनी मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे महत्त्व स्पष्ट करताना माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून या संस्थेची स्थापना झाल्याचे सांगितले. तसेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी तब्बल ३४ वर्षे अध्यक्ष म्हणून दिलेल्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख(Indrayani Sahitya Parishad) केला.
विश्वकोशाच्या ग्रंथालयात साहित्य, इतिहास, विज्ञान, तंत्रज्ञान, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, प्राणिशास्त्र, ललितकला आणि अंतराळ यांसारख्या विविध विषयांवरील सुमारे ४४ हजार ८०० संदर्भग्रंथ उपलब्ध आहेत. विश्वकोशाचे आतापर्यंत २१ खंड प्रकाशित झाले असून ‘अ’ ते ‘ज्ञ’ पर्यंतच्या सुमारे १८ हजार २४४ नोंदी त्यामध्ये समाविष्ट आहेत. मुलांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘कुमार विश्वकोशा’चे १२ खंड प्रकाशित झाले असून ‘ऑलिंपिक कोशा’चे कामही सुरू असल्याची माहिती सदस्यांना देण्यात(Indrayani Sahitya Parishad) आली.
याच इमारतीतील प्रज्ञा पाठशाळेलाही सदस्यांनी भेट दिली. संस्थेचे संचालक अनिल जोशी यांनी पाठशाळेचा इतिहास आणि कार्याची माहिती दिली. येथे सुमारे साडेदहा हजार हस्तलिखित पोथ्या जतन करण्यात आल्याचे त्यांनी(Indrayani Sahitya Parishad) सांगितले.
यानंतर सदस्यांनी महाबळेश्वरजवळील पुस्तकांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भिलार गावाला भेट दिली. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या पुढाकारातून राबविण्यात आलेला हा देशातील पहिलाच अभिनव प्रकल्प आहे. गावातील विविध घरांमध्ये, दुकाने आणि व्यावसायिक जागांमध्ये पुस्तक दालने सुरू करण्यात आली असून वाचन संस्कृती रुजविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात(Indrayani Sahitya Parishad) आहे.
प्रकल्पाधिकारी नारायण हळदे यांनी या उपक्रमाची माहिती दिली. तेजस्विनी देशमुख, दामोदर वहिले, डॉ. पौर्णिमा कोल्हे आणि माणिक सस्ते यांनी भिलार भेटीचे नियोजन केले. सदस्यांनी संपूर्ण गाव फिरून या प्रकल्पाची पाहणी (Indrayani Sahitya Parishad)केली.
सहलीदरम्यान पाचगणीजवळील गोडवली येथे नरवीर तानाजी मालुसरे यांच्या स्मारकालाही भेट देण्यात आली. महीपती साठे, सुदाम शिंदे आणि काळुराम दामू सस्ते यांनी या उपक्रमासाठी विशेष परिश्रम (Indrayani Sahitya Parishad)घेतले.
या अभ्यास सहलीत राम सासवडे, गीतांजली बोऱ्हाडे, स्वाती भोसले, संभाजी सस्ते, मुकुंद पापट, संदीप गावडे, सुरेश आल्हाट, पोपटराव पडवळ, मोतीराम राऊत यांच्यासह २५ सदस्य सहभागी झाले(Indrayani Sahitya Parishad) होते.
इंद्रायणी साहित्य परिषदेतर्फे साहित्य, इतिहास आणि सांस्कृतिक वारसा यांची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आतापर्यंत पाच अभ्यास सहलींचे आयोजन करण्यात आले (Indrayani Sahitya Parishad)आहे.
