प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहराला ऊर्जा स्वयंपूर्णतेकडे नेणाऱ्या दिशेने पुनावळे परिसरातील ‘७ प्लुमेरिया ड्राइव्ह’ या गृहनिर्माण संस्थेने उल्लेखनीय कामगिरी करून दाखवली आहे. सोसायटीत उभारण्यात आलेल्या ५७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी (दि. ८ फेब्रुवारी) आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रकल्पामुळे संस्थेच्या एकूण वीज खर्चात तब्बल ९० टक्क्यांपर्यंत घट होणार असून हा उपक्रम राज्यासाठी दिशादर्शक ठरत (Punawale Solar Society) आहे.
वीजबिलात मोठी कपात; आर्थिक शिस्तीचा नमुना
लोकार्पण सोहळ्यात आमदार जगताप म्हणाले की, “दरमहा ९ ते १० लाख रुपयांचे वीजबिल भरणाऱ्या या सोसायटीचे बिल आता अवघ्या ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत येणार आहे. अडीच कोटी रुपयांची गुंतवणूक करून उभारलेला हा सौर प्रकल्प शाश्वत विकासासोबतच दीर्घकालीन आर्थिक बचतीचा उत्तम नमुना आहे.” या प्रकल्पासाठी शासनाकडून ४० लाख रुपयांची सबसिडी मिळाली असून आमदार निधीतूनही १० लाख रुपयांचा हातभार लावण्यात आला (Punawale Solar Society) आहे.
हरित ऊर्जेतून पर्यावरण संवर्धन
सुमारे १० एकर परिसरात वसलेल्या या गृहनिर्माण संस्थेत ९५० सदनिका असून सुमारे ३ हजार नागरिक वास्तव्यास आहेत. सौर ऊर्जेच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होऊन पर्यावरण रक्षणाला हातभार लागणार आहे. सोसायटीचे अध्यक्ष डॉ. गणेश भामे, सचिव शिवराज हराळे, खजिनदार धनंजय पाठक तसेच सर्व सभासदांच्या सक्रिय सहभागातून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला (Punawale Solar Society)आहे.
शहरासाठी प्रेरणादायी उपक्रम
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हरित ऊर्जा धोरणाशी सुसंगत असा हा उपक्रम आहे. पिंपरी-चिंचवडमधील इतर गृहनिर्माण संस्थांनीही अशा प्रकारचे प्रकल्प राबविल्यास शहर ऊर्जा स्वयंपूर्ण होण्याचा मार्ग अधिक वेगाने मोकळा होईल,” असे आमदार शंकर जगताप यांनी स्पष्ट (Punawale Solar Society)केले.
