(पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी ): संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने ४ ते ९ जुलैदरम्यान शहरातील वाहतुकीत व्यापक बदल जाहीर केले आहेत. पालखी सोहळा सुरळीत आणि सुरक्षितपणे पार पडावा तसेच नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी जड वाहनांवर निर्बंध, काही मार्गांवर प्रवेशबंदी, एकेरी वाहतूक, नो-पार्किंग झोन आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली (Dnyaneshwar Mauli Palkhi) आहे.
८ जुलै रोजी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान करून रात्री गांधीवाडा येथे मुक्कामी असेल. त्यानंतर ९ जुलै रोजी गांधीवाडा येथून पालखी पुण्याकडे प्रस्थान करणार आहे. पालखीचा मार्ग आजोळघर, आळंदी नगरपरिषद चौक, योगीराज चौक, देहू फाटा, चऱ्होली फाटा, अंलकापूरम चौक, थोरल्या पादुका, मॅगझिन चौक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, दिघी, बोपखेल फाटा मार्गे विश्रांतवाडी असा राहणार (Dnyaneshwar Mauli Palkhi) आहे.
जड वाहनांवर निर्बंध
४ ते ८ जुलैदरम्यान चाकण-आळंदी, चिंबळी-आळंदी, शेलपिंपळगाव-वडगाव घेणंद-आळंदी, मरकळ-आळंदी, भारतमाता चौक-आळंदी आणि विश्रांतवाडी-आळंदी या मार्गांवर जड व अवजड वाहनांना प्रवेशबंदी राहील. या वाहनांसाठी भारतमाता चौक, पांजरपोळ चौक, अंलकापूरम, कोयाळी, मरकळ, चऱ्होली फाटा आदी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले (Dnyaneshwar Mauli Palkhi) आहेत.
शहरात प्रवेशबंदी
या कालावधीत आळंदी शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यावश्यक सेवा आणि दिंडीतील वाहनांव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना प्रवेशबंदी राहणार आहे. चऱ्होली फाटा, डुडुळगाव जकात नाका, केळगाव चौक, बापदेव चौक, इंद्रायणी हॉस्पिटल, धानोरी फाटा, पीसीएस चौक, देहू फाटा तसेच हवालदार वस्ती आणि तळेकर पाटील चौक मार्गे आळंदीकडे जाणाऱ्या वाहनांवरही निर्बंध लागू (Dnyaneshwar Mauli Palkhi) असतील.
एकेरी वाहतूक व्यवस्था
४ ते ८ जुलैदरम्यान हवालदार वस्ती, तळेकर पाटील चौक, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव, भारतमाता चौक आणि मोशी परिसरातील काही रस्त्यांवर एकेरी वाहतूक लागू राहणार (Dnyaneshwar Mauli Palkhi) आहे.
९ जुलैला कडक वाहतूक निर्बंध
९ जुलै रोजी पालखी पुणे शहराच्या हद्दीत प्रवेश करेपर्यंत विश्रांतवाडी, बोपखेल, मरकळ, चऱ्होली, मोशी चौक, भारतमाता चौक, हवालदार वस्ती, देहू फाटा, आळंदी फाटा, चिंबळी फाटा, वडगाव घेणंद, पांजरपोळ चौक, अंलकापूरम, भोसरी, मॅगझिन चौक, दिघी तसेच पालखी मार्गाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर अत्यावश्यक सेवा आणि दिंडीतील वाहनांव्यतिरिक्त इतर वाहनांना प्रवेश दिला जाणार (Dnyaneshwar Mauli Palkhi) नाही.
तुळापूरकडून येणाऱ्या जड वाहनांना मरकळमार्गे आळंदीकडे येण्यास मनाई करण्यात आली असून त्यांच्यासाठी कोयाळी व शेलपिंपळगावमार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला(Dnyaneshwar Mauli Palkhi) आहे.
नो-पार्किंग झोन
देहू फाटा ते बोपखेल फाटा या पालखी मार्गाच्या दोन्ही बाजूंना तात्पुरत्या स्वरूपात नो-पार्किंग झोन घोषित करण्यात आला (Dnyaneshwar Mauli Palkhi) आहे.
वाहनतळांची व्यवस्था
पालखी सोहळ्यासाठी देहूगाव, मोशी, चाकण, चिंबळी, मरकळ, वडगाव घेणंद आणि पुणे परिसरातून येणाऱ्या वाहनांसाठी तळेकर पाटील चौक, आदित्य इंटरनॅशनल स्कूल, ज्ञानविलास कॉलेज, मुंगसे पार्किंग, इंद्रायणी हॉस्पिटलसमोरील जागा, नगरपरिषद पार्किंग, पॉलिबॉण्ड कंपनीसमोरील जागा, प्लुमेरिया मंगल कार्यालय, बैलगाडा घाट (चऱ्होली) आणि मुक्ताई मंगल कार्यालय परिसरात स्वतंत्र वाहनतळ उपलब्ध करून देण्यात आले (Dnyaneshwar Mauli Palkhi) आहेत.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी नागरिकांनी वाहतूक बदलांचे पालन करून शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि पालखी सोहळ्यास सहकार्य करावे, असे आवाहन केले (Dnyaneshwar Mauli Palkhi) आहे.



