पिंपरी, दि. २६ जून : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित दोन दिवसीय ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ उत्साहात संपन्न झाले. २५ आणि २६ जून रोजी संभाजीनगर, चिंचवड येथील साई मंदिर उद्यानात झालेल्या या प्रबोधन पर्वात राजर्षी शाहू महाराज यांच्या समतावादी, पुरोगामी आणि लोककल्याणकारी विचारांचा विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांच्या माध्यमातून जागर करण्यात (Rajarshi Shahu Jayanti) आला.
प्रबोधन पर्वाचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाले. यावेळी माजी महापौर मंगला कदम, नगरसदस्य कुशाग्र कदम, अनुराधा गोरखे, सुप्रिया चांदगुडे, उपआयुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, कोल्हापूर जिल्हा मित्र मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग पाटील, कार्याध्यक्ष जगदीश परिट, सचिव सुनील पाटील, खजिनदार मिलिंद वेल्हाळ, उत्सव प्रमुख पी. वाय. पाटील आदी उपस्थित(Rajarshi Shahu Jayanti) होते.
यानंतर जयेंदू मातोश्री प्रोडक्शनच्या ७० कलाकारांनी सादर केलेल्या ‘फोक संस्कृती’ या बहुरंगी लोककला कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने (Rajarshi Shahu Jayanti) जिंकली.
दुसऱ्या दिवशी राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील प्रतिमा तसेच के.एस.बी. चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच दिवशी दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या १०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात (Rajarshi Shahu Jayanti) आला.
मुख्य सोहळ्यात सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल उद्योजक सखाराम रेडेकर यांना ‘शाहू महाराज पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला. तसेच पांडुरंग पाटील आणि संजय वडार यांना ‘कोल्हापूर भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात(Rajarshi Shahu Jayanti) आले.
याशिवाय सुनील गाडे, तानाजी भोसले, विठ्ठल मर्दाने, संजय व्हराबळे, दत्ता फासके, वर्षा विजय नाळे, अश्विनी लहू पाटील, योगिता विनायक रणसुभे, माधवी मिलिंद वेल्हाळ आणि धनश्री अक्षय पाटील यांना सामाजिक कार्यकर्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. तर युवराज मुळे, करण अनिल कारंडे आणि रेखाताई प्रकाश मुगडे यांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात(Rajarshi Shahu Jayanti) आला.
पुरस्कार वितरणानंतर ‘गौरवशाली महाराष्ट्र’ या सांस्कृतिक कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरा, संस्कृती आणि वारशाचे दर्शन घडविण्यात आले. समारोपाच्या सत्रात ‘स्वर स्वामी’ प्रस्तुत ‘वंदन – छत्रपती शाहू महाराजांना’ या शाहिरी व गीतांच्या कार्यक्रमातून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याला अभिवादन करण्यात (Rajarshi Shahu Jayanti) आले.
या दोन दिवसीय प्रबोधन पर्वाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाहू महाराजांच्या सामाजिक समता, शिक्षण आणि लोककल्याणाच्या विचारांना अभिवादन केले.


