पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध प्रभागांत इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर रुपीनगर–तळवडे प्रभागातून शहराच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक आदरयुक्त नाव असणाऱ्या केब्रिज स्कूलचे संचालक धनंजय वर्नेकर यांच्या सुविद्य पत्नी शीतल वर्नेकर या आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून (Rupinagar Talwade Election)
समोर येत आहे.
PCMC election 2026
Pawar Pattern:पिंपरी-चिंचवडमध्ये राजकीय भूकंप! भाजपविरोधात पवार कुटुंबाची एकजूट? सुप्रिया सुळेंचा पुढाकार

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपविरोधात ‘पवार फॉर्म्युला’ सक्रिय; काका–पुतणे एकत्र येण्याचे संकेत, सुप्रिया सुळे पुढाकारात
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागताच शहरातील राजकारणात मोठ्या हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली असली, तरी भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट – शरद पवार आणि अजित पवार – एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत (Pawar Pattern)आहेत.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची पहिली संयुक्त चर्चा नुकतीच पार पडली. या बैठकीला अजित पवार गटाचे निवडणूक समन्वयक नाना काटे आणि शरद पवार गटाच्या कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे उपस्थित होते. शहरातील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन भाजपविरोधात एकत्रित रणनीती आखण्यावर यावेळी प्राथमिक चर्चा (Pawar Pattern )करण्यात आली.
या बैठकीनंतर प्रतिक्रिया देताना नाना काटे यांनी महत्त्वाची माहिती उघड केली. “काही दिवसांपूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांचा मला फोन आला होता. मतांचे विभाजन टाळण्यासाठी आणि पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गटांमध्ये समन्वय साधण्याचा त्यांनी सल्ला दिला होता,” असे त्यांनी सांगितले. या चर्चांमुळे राष्ट्रवादीतील संभाव्य एकी ही केवळ स्थानिक पातळीवरील नसून, वरिष्ठ पातळीवरूनच घडत असल्याचे चित्र स्पष्ट झाले(Pawar Pattern) आहे.
नाना काटे आणि सुनील गव्हाणे यांनी ही बैठक अजित पवार, सुप्रिया सुळे आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसारच झाल्याचे स्पष्ट केले. यामध्ये भाजपविरोधी लढत प्रभावी कशी करता येईल, यावर विविध पर्यायांवर चर्चा करण्यात (Pawar Pattern) आली.
चर्चेतील प्रमुख मुद्दे पुढीलप्रमाणे होते —
निवडणूक चिन्ह : उमेदवार ‘घड्याळ’ चिन्हावर उभे करायचे की शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हावर?
आघाडीचा विस्तार : केवळ राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची युती करायची की अन्य पक्षांनाही सोबत घ्यायचे?
अंतिम रणनीती : भाजपला रोखण्यासाठी कोणते समीकरण अधिक परिणामकारक ठरेल?
दरम्यान, या सर्व घडामोडींवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढणार असली, तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणार असल्याचे (Pawar Pattern )त्यांनी स्पष्ट केले.
“या शहरांमध्ये आम्ही एकत्र लढलो, तर त्याचा फायदा विरोधकांना होईल. त्यामुळे येथे मैत्रीपूर्ण लढत होईल,” असे फडणवीस म्हणाले. मात्र, महापालिकेच्या सत्तास्थापनेच्या टप्प्यावर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) एकत्र येतील, असे संकेतही (Pawar Pattern )त्यांनी दिले.
मतदार याद्यांमधील त्रुटींविषयी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरही मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. मतदार यादीत काही प्रमाणात चुका असू शकतात, हे मान्य करतानाच, “त्यामुळे निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही,” असे ते म्हणाले. एसआयआर (SIR) प्रक्रियेमुळे या त्रुटी कमी होतील, तसेच भविष्यात मतदार याद्या ‘ब्लॉकचेन’ तंत्रज्ञानावर आणल्यास संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल, असा पर्यायही त्यांनी(Pawar Pattern ) सूचवला.
