(पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी:)पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ कायम आहे. शनिवारी (दि. ११ जुलै) सकाळी ७ वाजेपर्यंत धरण ७५.१७ टक्के भरले असून, शहराच्या पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने ही अत्यंत दिलासादायक बाब मानली जात (Pawana Dam Water) आहे.
अधिकृत आकडेवारीनुसार, धरणातील उपयुक्त पाणीसाठा १८१.१६ दशलक्ष घनमीटर, तर एकूण पाणीसाठा २१२.३० दशलक्ष घनमीटर इतका नोंदविण्यात आला आहे. धरणाची जलपातळी ६१०.४५ मीटर इतकी (Pawana Dam Water)आहे.
गेल्या २४ तासांत धरण परिसरात ३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, चालू पावसाळ्यातील एकूण पर्जन्यमान १,४८५ मिलिमीटर इतके झाले (Pawana Dam Water) आहे.
दरम्यान, शनिवारी सकाळी ७ वाजेपर्यंत पवना धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला नाही. पवना जलविद्युत केंद्र तसेच सांडव्यातूनही पाणी सोडण्यात आलेले नसून, धरणातून एकूण शून्य क्युसेक विसर्ग सुरू असल्याची नोंद (Pawana Dam Water) आहे.
सध्याच्या पावसाचा वेग आणि धरणातील वाढता पाणीसाठा लक्षात घेता, आगामी काळात पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीपुरवठ्याबाबतची चिंता मोठ्या प्रमाणात कमी झाली असून नागरिकांना दिलासा मिळाला(Pawana Dam Water) आहे.


