(पुनावळे, प्रतिनिधी ): पुनावळेचे भूमिपुत्र तथा निवृत्त कृषी अधिकारी दशरथ गार्डी यांचे वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार (Dashrath Gardi Death )आहे.
कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मोलाचे योगदान दिले. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावावे आणि त्यांना शेती क्षेत्रात प्रगती साधता यावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. कृषी क्षेत्रासोबतच त्यांनी अध्यात्मिक क्षेत्रातही हिरिरीने सहभाग(Dashrath Gardi Death ) घेतला.
महात्मा ज्योतिबा फुले मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या संत सावता भूषण पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड सीए संघटनेचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी हे त्यांचे चिरंजीव होत. त्यांच्या निधनाने सामाजिक, कृषी आणि अध्यात्मिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत(Dashrath Gardi Death ) आहे.



