Home माझं पिंपरी चिंचवड Shravandhara Kavi Sammelan:शिवे येथे ‘श्रावणधारा कविसंमेलन’ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कवितांनी रंगली शब्दांची मैफल

Shravandhara Kavi Sammelan:शिवे येथे ‘श्रावणधारा कविसंमेलन’ उत्साहात; विद्यार्थ्यांच्या कवितांनी रंगली शब्दांची मैफल

इंद्रायणी साहित्य परिषद आणि स्व. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालयाच्या संयुक्त विद्यमाने शिवे येथे ‘श्रावणधारा कविसंमेलन’ उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांच्या कवितांना रसिकांची दाद मिळाली.

by Admin
Spread the love

पिंपरी (दि. २२ ऑगस्ट २०२६) — शेजारच्या हिरव्यागार डोंगररांगांतून खळाळत येणाऱ्या पाण्याच्या धारा आणि निसर्गसंपन्न आसमंतात बरसणाऱ्या श्रावणसरी… अशा रम्य वातावरणात शिवे येथील ज्ञानदीप विद्यालयाच्या सभागृहात कवितेच्या शब्दसरीही बरसल्या. कविता, भावना, विचार आणि वाचनसंस्कृतीचा सुंदर संगम घडवत ‘श्रावणधारा कविसंमेलन’ उत्साहात संपन्न (Shravandhara Kavi Sammelan) झाले.

 

मोशी येथील इंद्रायणी साहित्य परिषद आणि स्व. रामचंद्र महादेव गडदे स्मृती वाचनालय, शिवे यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि. २१ ऑगस्ट) या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषा-साहित्याची गोडी निर्माण करणे, वाचनाची आवड वाढविणे आणि त्यांच्या सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळवून देणे हा या उपक्रमामागील उद्देश(Shravandhara Kavi Sammelan) होता.

 

विद्यार्थ्यांच्या कवितांनी कविसंमेलनाची सुरुवात झाली. श्रावण, निसर्ग, पाऊस, मैत्री, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील विविध अनुभव त्यांनी आपल्या कवितांमधून प्रभावीपणे मांडले. मंचावर कविता सादर करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि त्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला मिळणाऱ्या टाळ्यांनी वातावरण भारावून(Shravandhara Kavi Sammelan) गेले.

यानंतर प्रथितयश कवी-कवयित्रींच्या कवितांनी मैफलीला रंगत आणली. निसर्ग, मानवी भावना आणि समाजवास्तवाच्या विविध छटांनी रसिकांना कधी अंतर्मुख केले, तर कधी हास्य आणि टाळ्यांचा कडकडाट घडवून (Shravandhara Kavi Sammelan)आणला.

 

इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक अरुण बोऱ्हाडे यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा आणि साहित्याची गोडी खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी परिषद प्रथितयश लेखक-कवींना घेऊन ग्रामीण भागात येत असल्याचे(Shravandhara Kavi Sammelan) सांगितले.

 

यावेळी परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर, उपाध्यक्षा डॉ. पौर्णिमा कोल्हे, सचिव राम सासवडे, शिवे येथील वाचनालयाचे प्रमुख रोहिदास गडदे, कवी चंद्रकांत धस, प्रा. महादेव रोकडे, शिवाजी चव्हाण, एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर, प्रा. जयश्री थोरवे, रेखा दुसाने, सीमा जाधव आदी उपस्थित(Shravandhara Kavi Sammelan) होते.

 

वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी परिषदेच्या वतीने शाळा आणि वाचनालयाला पुस्तके भेट देण्यात आली. प्रा. महादेव रोकडे यांनी विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाचे महत्त्व सांगितले, तर रोहिदास गडदे यांनी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. मुख्याध्यापक शंकर साळुंखे यांनी स्वागत केले. तेजस्विनी देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. माणिक सस्ते व अलंकार हिंगे यांनी संयोजन(Shravandhara Kavi Sammelan) केले.

 

कविसंमेलनानंतर उपस्थितांनी शिवे येथील गडदे स्मृती वाचनालयाला भेट दिली. दुर्गम गावातील समृद्ध वाचनालय पाहून उपस्थितांनी कौतुक व्यक्त (Shravandhara Kavi Sammelan)केले.


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00