Home आरोग्य Pcmc Water Crisis:टँकर माफियांवर निर्बंध आणा; पाणीपुरवठ्यातील त्रुटींवर खासदार श्रीरंग बारणे यांचा महापालिकेला इशारा

Pcmc Water Crisis:टँकर माफियांवर निर्बंध आणा; पाणीपुरवठ्यातील त्रुटींवर खासदार श्रीरंग बारणे यांचा महापालिकेला इशारा

पिंपरी-चिंचवडमधील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी महापालिकेची बैठक घेत टँकर माफियांवर कारवाई, पाणी गळती रोखणे, STP प्रकल्प सुरू करणे आणि पवना जलवाहिनी प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले.

by Admin
Spread the love

(पिंपरी,प्रतिनिधी दि. २२ जून ): पिंपरी-चिंचवड शहरात पाणी कपात आणि विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग बारणे यांनी सोमवारी महापालिका अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेत शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी टँकर चालकांच्या मनमानीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला (Pcmc Water Crisis) दिले.

 

टँकरद्वारे पुरवले जाणारे पाणी नेमके कुठून भरले जाते, ते पिण्यायोग्य आहे का, याची सखोल तपासणी करावी. सोसायट्यांकडून जादा दर आकारणाऱ्या टँकर चालकांची नोंद ठेवून त्यांच्यावर निर्बंध आणावेत, तसेच दूषित पाणीपुरवठा करणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, असे बारणे यांनी स्पष्ट (Pcmc Water Crisis)केले.

 

बैठकीत त्यांनी शहरातील सुमारे ३० टक्के पाणी गळती, अनधिकृत नळजोडण्या आणि समान पाणीवाटपासाठी राबविण्यात आलेल्या ‘स्काडा’ (SCADA) प्रणाली असूनही कायम असलेल्या पाणीटंचाईबाबत नाराजी व्यक्त केली. नदीपात्रातील अस्वच्छतेमुळे अशुद्ध पाण्याचा उपसा होत असल्याने संबंधित परिसराची तातडीने स्वच्छता करावी तसेच मुळशी धरणातून अतिरिक्त ७ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी (Pcmc Water Crisis) दिल्या.

 

बैठकीत शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांचाही (STP) आढावा घेण्यात आला. शहरातील ४९४ सोसायट्यांपैकी ३६९ सोसायट्यांचे एसटीपी सुरू असून १२५ प्रकल्प बंद असल्याची माहिती समोर आली. बंद प्रकल्पांवर कठोर देखरेख ठेवावी आणि जागेअभावी एसटीपी उभारता न येणाऱ्या जुन्या सोसायट्यांसाठी महापालिकेने लहान एसीटीपी (ACTP) प्रकल्प उभारण्याचा विचार करावा, असेही त्यांनी (Pcmc Water Crisis) सुचवले.

 

यावेळी किवळे परिसरातील दोन गृहप्रकल्पांच्या बांधकामादरम्यान पवना बंदिस्त जलवाहिनीचे कोट्यवधी रुपयांचे पाइप अनधिकृतपणे काढून टाकल्याची गंभीर बाबही चर्चेत आली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश बारणे यांनी (Pcmc Water Crisis) दिले.

 

बैठकीला अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, माजी नगरसेविका सुलभा उबाळे, पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता अजय सूर्यवंशी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित (Pcmc Water Crisis) होते.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00