प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने (AHTU) वाकड परिसरातील एका स्पा सेंटरवर धडक कारवाई करत कथित वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून स्पा सेंटरच्या महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली (Wakad Spa Center)आहे.
पोलिसांना वाकड येथील भुजबळ वस्ती परिसरातील भामा सेंटरमधील ‘ब्लू डायमंड रिलॅक्सो स्पा’ येथे अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली शेंडगे यांच्या पथकाने ५ जून २०२६ रोजी सायंकाळी छापा (Wakad Spa Center)टाकला.
या प्रकरणी स्पा चालक मारुती ज्ञानेश्वर मुरडे (वय ४८) आणि व्यवस्थापक वैशाली संतोष चव्हाण (वय ३१) यांच्याविरुद्ध हिंजवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा (PITA) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी महिला व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू (Wakad Spa Center)आहे.
पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या निर्देशानुसार गुन्हे शाखेकडून अवैध वेश्याव्यवसायाविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील तीन वर्षांत अशा प्रकारच्या ३० आस्थापनांवर कारवाई करून ती एक वर्षासाठी बंद करण्यात आली (Wakad Spa Center)आहेत.
स्पा, मसाज सेंटर किंवा हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक तसेच निवासी भागातील संशयित आस्थापनांची चौकशी सुरू असून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात (Wakad Spa Center) आले.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलीस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलीस उपायुक्त रोहिदास पवार, डॉ. शिवाजी पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU पथकाने (Wakad Spa Center)केली.
