Home आरोग्य Chakan MIDC Leopard:चाकण एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये बिबट्याचा वावर; कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Chakan MIDC Leopard:चाकण एमआयडीसीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये बिबट्याचा वावर; कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

कुरुळी परिसरात सलग दोन दिवस बिबट्या दिसल्याने खळबळ; वनविभागाची शोधमोहीम सुरू

by Admin
Spread the love

चाकण : चाकण एमआयडीसी परिसरातील दोन बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या आवारात बिबट्याचा वावर आढळल्याने औद्योगिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. विशेषतः कुरुळी येथील एका नामांकित कंपनीच्या परिसरात बिबट्या सलग दोन दिवस दिसून आल्याने कामगार आणि कर्मचारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत (Chakan MIDC Leopard)आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास कंपनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या फिरताना दिसून आला. ही बाब लक्षात येताच कंपनी प्रशासनाने तातडीने वनविभागाशी संपर्क साधला. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करण्यात आली. मात्र, पहिल्या दिवशी बिबट्याचा कोणताही ठावठिकाणा लागला(Chakan MIDC Leopard ) नाही.

 

दरम्यान, गुरुवारी पुन्हा त्याच परिसरात बिबट्या दिसल्याची माहिती समोर आली. काही कामगारांनी प्रत्यक्ष बिबट्याला पाहिल्याचा दावा केल्याने परिसरात घबराट पसरली. कंपनी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले(Chakan MIDC Leopard ) आहे.

 

वनविभागाने परिसरात शोधमोहीम सुरू केली असून, बिबट्या जवळील डोंगराळ किंवा झाडीच्या भागातून भक्ष्याच्या शोधात औद्योगिक परिसरात आल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अद्याप बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आलेले (Chakan MIDC Leopard )नाही.

 

दरम्यान, वनविभागाने नागरिक आणि कामगारांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे तसेच सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. चाकण एमआयडीसीसारख्या गजबजलेल्या औद्योगिक परिसरात बिबट्याचा वावर आढळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, परिसरात भीतीचे वातावरण कायम (Chakan MIDC Leopard )आहे.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00