(आकुर्डी) : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि इतिहास अभ्यासक शिवाजीराव शिर्के यांना पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. संभाजीनगर, आकुर्डी येथील महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्रात नुकत्याच झालेल्या आदरांजली सभेला शहरातील विविध सामाजिक व साहित्यिक संस्थांचे प्रतिनिधी, गुणवंत कामगार आणि साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित (Shivajirao Shirke Tribute) होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी हरिभक्त परायण शामराव गायकवाड यांचे प्रवचन झाले. महंमद शरीफ मुलाणी यांनी प्रास्ताविक(Shivajirao Shirke Tribute) केले.
यावेळी गुणवंत कामगार कल्याण मंडळाच्या अध्यक्षा भारतीताई चव्हाण, बंधुता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश रोकडे, कामगार नेते अरुण बोऱ्हाडे, अशोककुमार पगारिया, नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाचे अध्यक्ष राज अहेरराव, पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समितीचे राजेंद्र घावटे, दिलासा संस्था व शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, कलारंजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले, वसुंधरा पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष तानाजी एकोंडे, गुणवंत कामगार राजेश हजारे, उद्योजक रामदास माने, गिर्यारोहक अरविंद वाडकर, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र उद्योगनगरचे केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, गुणवंत कामगार सुदाम शिंदे, शंकर आथरे, कवी सुभाष चटणे, बी. आर. माडगूळकर, कवी शामराव सरकाळे, मुरलीधर दळवी, हरिभक्त परायण अशोक महाराज गोरे, भरत शिंदे, महेंद्र गायकवाड, शरद काणेकर, अण्णा गुरव, पांडुरंग सुतार, शिवराज शिंदे आणि नामदेव हुले आदींनी शिवाजीराव शिर्के यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली अर्पण (Shivajirao Shirke Tribute) केली.
लेखक, कवी, ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते अशा विविध भूमिकांतून शिवाजीराव शिर्के यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख मान्यवरांनी आपल्या मनोगतात केला. त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि पत्रकारितेतील योगदानाच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचे विविध पैलू उपस्थितांनी (Shivajirao Shirke Tribute)मांडले.
यावेळी शहरातील असंख्य गुणवंत कामगार आणि साहित्यिक उपस्थित होते. हरिभक्त परायण साखरचंद लोखंडे यांच्या पसायदानाने आदरांजली सभेची सांगता (Shivajirao Shirke Tribute) झाली.
