Home प्रेरणा / यशकथा Pratibha Junior College:प्रतिभा कॉलेजच्या दिव्या घोडेकरचे अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णयश; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

Pratibha Junior College:प्रतिभा कॉलेजच्या दिव्या घोडेकरचे अ‍ॅथलेटिक्समध्ये सुवर्णयश; राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरीतील देवंरन येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत प्रतिभा ज्युनियर कॉलेजच्या दिव्या घोडेकरने १००० मीटर धावण्यात सुवर्णपदक पटकावले. गोवा येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तिची निवड झाली.

by Admin
Spread the love

(पिंपरी, प्रतिनिधी ): रत्नागिरी जिल्ह्यातील देवंरन

येथे आयोजित ४० व्या महाराष्ट्र राज्य अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये प्रतिभा ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी कु. दिव्या घोडेकर हिने उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या दैदिप्यमान यशाच्या बळावर तिची गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली(Pratibha Junior College) आहे.

महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आयोजित या राज्यस्तरीय स्पर्धेत दिव्याने १८ वर्षांखालील मुलींच्या गटातील १००० मीटर धावण्याच्या शर्यतीत ३ मिनिटे ०६.१६ सेकंदांची उत्कृष्ट वेळ नोंदवून संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला. तिच्या या कामगिरीमुळे तिने सुवर्णपदकावर आपले नाव(Pratibha Junior College) कोरले.

राष्ट्रीय स्पर्धेत करणार महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व
राज्यस्तरीय स्पर्धेतील या यशामुळे दिव्याची २७ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत गोवा येथे होणाऱ्या ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत ती महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहे.
दिव्या सध्या प्रतिभा ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावी कॉमर्स शाखेत शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करत तिने महाविद्यालयाचे नाव राज्यस्तरावर उज्ज्वल केले (Pratibha Junior College)आहे.

दिव्याच्या या यशाबद्दल कमला एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक-सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, संचालिका डॉ. तेजल शहा, प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, क्रीडा विभागप्रमुख डॉ. शबाना शेख तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले. राष्ट्रीय स्पर्धेसाठी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा (Pratibha Junior College)दिल्या.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00