Home माझं पिंपरी चिंचवड Dr. Vijay Suryavanshi :पिंपरी-चिंचवड गणेशोत्सव : रस्ते, स्वच्छता, विद्युत सुरक्षा, विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य; आयुक्त सूर्यवंशींचे निर्देश

Dr. Vijay Suryavanshi :पिंपरी-चिंचवड गणेशोत्सव : रस्ते, स्वच्छता, विद्युत सुरक्षा, विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य; आयुक्त सूर्यवंशींचे निर्देश

पिंपरी-चिंचवडमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध विभागांचा आढावा घेतला. रस्ते, स्वच्छता, पदपथ, विद्युत सुरक्षा व विसर्जन व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे निर्देश.

by Admin
Spread the love

(पिंपरी, दि. ३१ ऑगस्ट २०२६) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची सुरक्षितता तपासून धोकादायक तसेच अनधिकृत जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी, स्वच्छता, प्रकाशयोजना आणि सुरक्षा व्यवस्था वेळेत पूर्ण करावी. तसेच प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याने आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर, अतिक्रमणमुक्त आणि नागरिकांसाठी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडावी, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी (Dr. Vijay Suryavanshi)दिल्या.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात आगामी गणेशोत्सव तसेच शहरातील विविध नागरी सुविधांच्या अनुषंगाने आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी विभागप्रमुख व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी शहरातील अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे, स्वच्छता व्यवस्था, रस्ते व पदपथांची स्थिती, विद्युत सुरक्षा, उद्याने, गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी आणि नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा आदी विषयांचा आढावा घेण्यात (Dr. Vijay Suryavanshi)आला.

 

यावेळी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, तृप्ती सांडभोर, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी, प्रेरणा सिनकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, उपआयुक्त सचिन पवार, सीताराम बहुरे, राजेश आगळे, डॉ. प्रदीप ठेंगल, अण्णा बोदडे, व्यंकटेश दुर्वास, संदीप खोत, पंकज पाटील, मुख्य उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, सहाय्यक आयुक्त अमित पंडित, तानाजी नरळे, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, परशुराम वाघमोडे, गोरक्षनाथ लिम्हण, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड यांच्यासह स्थापत्य, विद्युत, पर्यावरण आदी विभागांचे कार्यकारी अभियंता व कर्मचारी उपस्थित (Dr. Vijay Suryavanshi)होते.

 

कृत्रिम विसर्जन हौदांची तयारी वेळेत पूर्ण करा

 

गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील कृत्रिम विसर्जन हौदांची आवश्यक तयारी वेळेत पूर्ण करावी. विसर्जनस्थळी स्वच्छता, पुरेशी प्रकाश व्यवस्था, सुरक्षा तसेच नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. गणेशोत्सव काळात महापालिकेच्या विविध विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश आयुक्तांनी(Dr. Vijay Suryavanshi) दिले.

 

विद्युत सुरक्षेसह रस्ते व स्वच्छतेला प्राधान्य

 

गणेशोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील विद्युत तारा व जोडण्यांची तपासणी करून धोकादायक किंवा अनधिकृत जोडण्यांवर संबंधित यंत्रणांच्या समन्वयाने तातडीने कार्यवाही करावी. उत्सव काळात स्वच्छता व्यवस्था अधिक प्रभावी ठेवावी. शहरातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची कार्यवाही प्राधान्याने पूर्ण करावी, तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना(Dr. Vijay Suryavanshi) कराव्यात.

 

प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवा

 

आपला प्रभाग स्वच्छ, सुंदर आणि अतिक्रमणमुक्त ठेवणे ही प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्याची जबाबदारी आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पदपथांवरील अतिक्रमणे तातडीने हटवून ते पादचाऱ्यांसाठी मोकळे करून द्यावेत. सार्वजनिक स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता करावी, आवश्यकतेनुसार झाडांची छाटणी करावी आणि रस्ते सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात(Dr. Vijay Suryavanshi) आले.

 

अनधिकृत बांधकामांवर बारकाईने लक्ष ठेवा

 

प्रभागातील अनधिकृत बांधकामांवर बीट निरीक्षकांमार्फत बारकाईने लक्ष ठेवावे. नव्याने होत असलेल्या अनधिकृत बांधकामांची माहिती तातडीने संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून त्यावर निष्कासनाची कार्यवाही करावी. अनधिकृत बांधकामांना कोणत्याही परिस्थितीत प्रोत्साहन मिळणार नाही, याची दक्षता घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई (Dr. Vijay Suryavanshi)करावी.

 

अनधिकृत बांधकामांची नळ, वीज जोडणी खंडित करण्याची कार्यवाही करा

 

अनधिकृत बांधकामांविरोधात निष्कासनाची कारवाई करण्याबरोबरच अशा बांधकामांना देण्यात आलेल्या नळजोडण्या आणि विद्युत जोडण्या नियमानुसार खंडित करण्याबाबत कार्यवाही करावी. संबंधित प्रकरणांमध्ये आवश्यक कायदेशीर कारवाईही करावी, अशा सूचना आयुक्तांनी(Dr. Vijay Suryavanshi) दिल्या.

 

सदनिका खरेदीपूर्वी बांधकामाची पडताळणी करण्याबाबत जनजागृती करा

 

नागरिकांनी सदनिका किंवा इमारतीमधील मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी संबंधित बांधकाम अधिकृत आहे किंवा नाही, याची पडताळणी करावी, याबाबत जनजागृती करावी. मंजूर बांधकाम आराखडा, आवश्यक परवानग्या आणि महापालिकेच्या संबंधित नोंदी तपासूनच मालमत्ता खरेदी करावी, याबाबत नागरिकांना अवगत करण्याचे निर्देश देण्यात (Dr. Vijay Suryavanshi)आले.

 

नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करा

 

महापालिकेच्या सारथी प्रणालीवर तसेच शासनाच्या संकेतस्थळांवर प्राप्त होणाऱ्या नागरिकांच्या तक्रारींची संबंधित विभागप्रमुखांनी तातडीने दखल घेऊन त्यांचा विहित वेळेत निपटारा करावा. तक्रारी प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी अधिकाऱ्यांनी नियमितपणे तक्रारींचा आढावा घ्यावा आणि केलेल्या कार्यवाहीची नोंद (Dr. Vijay Suryavanshi)ठेवावी.

 

लोकप्रतिनिधींच्या पत्रांना आणि तक्रारींना वेळेत प्रतिसाद द्या

 

लोकप्रतिनिधींकडून महापालिकेकडे प्राप्त होणारी पत्रे, निवेदने आणि तक्रारी यांची संबंधित विभागांनी गांभीर्याने दखल घेऊन त्यावर वेळेत कार्यवाही करावी. प्राप्त पत्रांना अनावश्यक विलंब होणार नाही, याची दक्षता घेऊन करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती संबंधित लोकप्रतिनिधींना वेळेत (Dr. Vijay Suryavanshi)कळवावी.

 

वाचनालये, ग्रंथालये आणि व्यायामशाळांची संख्या वाढवा

 

नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शहरातील वाचनालये, ग्रंथालये आणि व्यायामशाळांची संख्या वाढविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय उपलब्ध जागांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार जागा निश्चित कराव्यात. नागरिकांच्या गरजा आणि स्थानिक मागणीचा विचार करून या सुविधा विकसित करण्याबाबत नियोजन करावे, अशा सूचनाही आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना(Dr. Vijay Suryavanshi) दिल्या.

 


Spread the love

You may also like

Leave a Comment

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?
-
00:00
00:00
Update Required Flash plugin
-
00:00
00:00