पिंपरी चिंचवड : निगडी परिसरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा जुने जाणते नागरिक पांडुरंग बाबुराव काळभोर यांचे दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८२ वर्षे होते. मागील काही दिवसांपासून वयोमानपरत्वे ते आजारी होते. उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास (Pandurang Kalbhor Death) घेतला.
निगडी परिसरात पांडुरंग काळभोर हे एक प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक वर्षे परिसरातील विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला होता. त्यांच्या साध्या राहणीमानामुळे आणि लोकांशी जिव्हाळ्याच्या नात्यामुळे त्यांना परिसरात विशेष मानाचे स्थान (Pandurang Kalbhor Death) होते.
देहूरोड कॅन्टोन्मेंटच्या माजी अध्यक्षा स्वर्गीय लिलावती काळभोर या त्यांच्या पत्नी होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काळभोर हे त्यांचे चिरंजीव (Pandurang Kalbhor Death) आहेत.
त्यांच्यावर निगडी येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित(Pandurang Kalbhor Death) होते.
त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, नातवंडे असा परिवार आहे. पांडुरंग काळभोर यांच्या निधनाने निगडी परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून अनेकांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण (Pandurang Kalbhor Death) केली.



