प्रतिनिधी :पिंपरी-चिंचवड शहरातील फुगेवाडी-दापोडी परिसरात आज दुपारच्या सुमारास पाच जणांच्या मृत्यूची माहिती समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. या सर्व मृत्यूंचा परस्परांशी थेट संबंध नसून प्रत्येक प्रकरण स्वतंत्र असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच मृतांपैकी चार जणांना दारू पिण्याचा कोणताही इतिहास नसल्याचे नातेवाईकांनी स्पष्ट केले (Fugewadi Deaths)आहे.
दापोडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित तपास पथक सध्या वायसीएम रुग्णालयात उपस्थित असून संपूर्ण घटनेचा सखोल तपास सुरू (Fugewadi Deaths) आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पांडुरंग सदाशिव फुगे (वय ५७) यांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाल्याचा नातेवाईकांचा दावा आहे. त्यांना कोणत्याही रुग्णालयात दाखल करण्यात आले नव्हते. तसेच त्यांना मद्यपानाची सवय नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. नातेवाईकांनी कोणतीही तक्रार नोंदवली नसून दुपारच्या सुमारास त्यांच्यावर अंत्यसंस्कारही करण्यात (Fugewadi Deaths) .
दुसरे प्रकरण विजय प्रकाश राठोड (वय ३१) आणि राजेंद्र प्रकाश राठोड (वय ३४) या सख्ख्या भावांचे आहे. विजय राठोड हे खासगी मुव्हर्स अँड पॅकर्स कंपनीमध्ये काम करत होते. काल दुपारच्या सुमारास विश्रांतवाडी परिसरात पॅकेजिंगचे काम सुरू असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर सहकारी कामगारांनी त्यांना कॅन्टोन्मेंट हॉस्पिटल, खडकी येथे दाखल (Fugewadi Deaths) केले.
विजय यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांचे वडील आणि भाऊ राजेंद्र हे रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात उपस्थित होते. आज सकाळी सुमारे सातच्या सुमारास विजय यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर भाऊ राजेंद्र यांचीही प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तत्काळ औंध रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दोन्ही भावांचा मृत्यू प्रथमदर्शनी हृदयविकाराच्या झटक्यामुळे झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंबीयांच्या जबाबानुसार दोघांनाही मद्यपानाची सवय न(Fugewadi Deaths) व्हती.
याशिवाय राजेंद्र राजपूत (वय ५१) यांचा बाथरूममध्ये चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनाही मद्यपानाची सवय नसल्याचे नातेवाईकांनी(Fugewadi Deaths) सांगितले.
अकबर पठाण (वय ५२) यांचा मृत्यू काल रात्री साडेनऊच्या सुमारास झाला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, अकबर पठाण यांना गेल्या पंधरा वर्षांपासून मद्यपानाची सवय (Fugewadi Deaths) होती.
या पाचही मृत्यूंमुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले असले तरी सर्व घटनांचा परस्पर संबंध आढळून आलेला नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वैद्यकीय अहवाल आणि शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी(Fugewadi Deaths) सांगितले.
दरम्यान, दापोडी पोलिसांकडून सर्व घटनांचा स्वतंत्र तपास सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.(Fugewadi Deaths)
