प्रतिनिधी :श्री मयुरेश्वर अवतार श्रीमंत महासाधू श्री मोरया गोसावी महाराजांच्या ४६४ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन यंदा ६ ते १० डिसेंबर २०२५ दरम्यान संजीवन समाधी मंदिर आणि श्री मंगलमूर्ती वाडा, चिंचवड येथे भव्य उत्साहात करण्यात आले आहे. यंदाच्या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे ‘इथेनॉल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांना ‘श्री मोरया गोसावी महाराज जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, योगिता गोडबोले, संदीप उबाळे आणि पं. भुवनेश कुमार कोमकली यांच्या गायनाची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. संकर्षण आणि स्पृहा यांच्या विशेष कार्यक्रमांसह योगेश सोमण यांचा ‘आनंदडोह’ हा बहुप्रतीक्षित सांस्कृतिक कार्यक्रमही यंदा विशेष (Morya Gosavi Mahotsav)आकर्षण ठरणार आहे.
पुणे
प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा, युनिट ३ यांनी उल्लेखनीय कामगिरी करत अपहरण आणि गंभीर दुखापत प्रकरणातील ३ मुख्य आरोपी तसेच गुन्ह्यात सहभागी २ बालकांना अवघ्या १२ तासांत ताब्यात घेतले आहे. दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी आळंदी पोलीस स्टेशनच्या हद्दीत चारजणांना मारहाण करून त्यापैकी दोघांचे अपहरण करण्यात आले होते, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस आयुक्त श्री. विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने या गुन्ह्याचा युद्धपातळीवर तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढून त्यांना तातडीने ताब्यात घेण्यात (Pune Police) आले.
या प्रकरणात सुदर्शन महादेव आडे यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या मित्रांपैकी विकास अर्जन सोनकांबळे आणि संतोष भाऊसाहेब हांबर्डे यांचे अपहरण करण्यात आले होते. तपासादरम्यान पोलिसांनी देहूफाटा परिसरातून मुख्य संशयित सुबोध मल्हारी कांबळे (वय २०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली देत साथीदारांची माहिती दिली. त्यानुसार भोसरी परिसरातून ओंकार संजय कांबळे (वय १८), सुरज महादेव शिंदे (वय १९) आणि गुन्ह्यात सहभागी असलेली २ बालके यांनाही(Pune Police) ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत आरोपींनी रस्ता विचारण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून हा गंभीर गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांनी फिर्यादी सुदर्शन आडे आणि त्यांच्या मित्रांना मारहाण करून त्यांच्याकडून पाचशे रुपये रोख रक्कम आणि दोन मोबाईल फोन हिसकावले. त्यानंतर विकास सोनकांबळे आणि संतोष हांबर्डे यांना ‘छोटा हत्ती’ टेम्पोमध्ये जबरदस्ती बसवून आळंदी ते चाकण मार्गावरील जंगल भागात नेले आणि तेथे पुन्हा मारहाण करून(Pune Police) त्यांना सोडून दिले.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले दोन मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो असा एकूण चार लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हा गंभीर गुन्हा पोलीस उप-आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने(Pune Police) अल्पावधीत उघडकीस आणला.
Labour Law Protest:कामगार-विरोधी नवे ४ कामगार कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी – इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम
पिंपरी प्रतिनिधी : देशातील कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे केंद्र सरकारचे नवे ४ कामगार कायदे (Labour Codes) तात्काळ रद्द करण्यातयावेत, अशी ठाम मागणी इंटकचे प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी चौक येथे झालेल्या साखळी आंदोलनादरम्कायद्यांमुळे रोजगार सुरक्षा, वेतन संरक्षण, आरोग्य–सुरक्षा आणि संघटन स्वातंत्र्य धोक्यात येत असल्याचा आरोप इंटकतर्फे करण्यात (Labour Law Protest)आला.
यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले, “सरकारने विद्यमान २९ कामगार कायद्यांचे एकत्रीकरण करून ४ नवे कोड लागू करण्याची घोषणा केली असून, १ डिसेंबर २०२५ पासून त्यांची अंमलबजावणी करण्याचे संकेत दिले आहेत. मात्र हे कायदे संपूर्णपणे उद्योगपतींच्या बाजूने असून कामगार हिताला बाधक (Labour Law Protest) आहेत.
त्यानुसार नव्या ‘४ काळ्या कायद्यां’वर इंटकतर्फे खालील आक्षेप नोंदविण्यात आले :
१. औद्योगिक संबंध कोड – नियोक्त्यांना कामगार कपात, कारखाना बंद करणे आणि ‘नोकरी–संपादन’ प्रक्रिया अत्यंत सुलभ; त्यामुळे कामगारांचे रोजगाराधिकार धोक्यात.
२. सुरक्षा, आरोग्य व कार्यक्षेत्र वातावरण कोड – कामाचे तास, आरोग्य-सुरक्षा, अपघात प्रतिबंधक तरतुदी यांमध्ये शिथिलता; कामगार सुरक्षिततेला धोका.
३. वेतन कोड – वेतन निश्चिती, ओव्हरटाईम आणि बोनससंबंधित तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणावर संकुचन.
४. सामाजिक सुरक्षा कोड – EPF, ESI, ग्रॅच्युइटी, बांधकाम कामगार कल्याण योजना एकत्र करून प्रत्यक्ष संरक्षण कमी; अनेक विद्यमान कल्याणकारी योजना कमकुवत.
डॉ. कदम म्हणाले, “सामाजिक सुरक्षा योजनेच्या नावाखाली 100% संरक्षणाचा दावा हा केवळ भ्रम आहे. प्रत्यक्षात अनेक महत्त्वाच्या कल्याणकारी योजनांची परिणामकारकता(Labour Law Protest) कमी करण्यात आली आहे.”
दहा वर्षांची ग्रॅच्युइटी, तीही मर्यादित क्षेत्रात; असंघटित, ठेका व प्लॅटफॉर्म कामगारांसाठी अपुऱ्या व अस्पष्ट तरतुदी—याबाबतही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या कायद्यांमुळे उद्योगपतींना मनमानी अधिकार मिळतील, तर कामगारांचे रोजगारावरील आणि संघटनेवरील हक्क गंभीरपणे बाधित होतील. याचा परिणाम म्हणून औद्योगिक शांतता व कामगार–मालक संबंध बिघडण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इंटकच्या प्रमुख मागण्या :
केंद्र सरकारचे नवे ४ कामगार कायदे संपूर्णपणे रद्द करावेत.
कामगार हिताचे विद्यमान कायदे पूर्ववत लागू करावेत.
कामगार संघटनांच्या सल्लामसलत
इंटकने औद्योगिक संबंध कोड, सुरक्षा–आरोग्य कोड, वेतन कोड आणि सामाजिक सुरक्षा कोड या सर्वांवर गंभीर आक्षेप नोंदवले. सामाजिक सुरक्षा योजनेतील 100% संरक्षणाचा दावा भ्रम असल्याचेही कदम यांनी सांगितले.
या आंदोलनात विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी (Labour Law Protest)झाले होते.
केद्र सरकारने जाहीर केलेल्या नव्या चार कामगार कायद्यांनी देशातील कामगारांच्या मूलभूत हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत, हे कायदे तात्काळ रद्द करण्याची मागणी इंटक प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी पिंपरी चौकात झालेल्या साखळी आंदोलनादरम्यान केली.डॉ. कदम म्हणाले, “विद्यमान २९ कायद्यांचे एकत्रीकरण करून सरकार चार नवीन कोड लागू करत आहे. मात्र हे सर्व कोड उद्योगपतींना मनमानी अधिकार देणारे असून कामगारांच्या रोजगार, वेतन, सुरक्षितता आणि संघटन स्वातंत्र्यावर प्रतिकूल परिणाम करणारे आहेत.”
इंटकने औद्योगिक संबंध कोड, सुरक्षा–आरोग्य कोड, वेतन कोड आणि सामाजिक सुरक्षा कोड या सर्वांवर आक्षेप घेत, विद्यमान कल्याणकारी योजनांचे संरक्षण कमी झाल्याचा आरोप केला. विशेषतः असंघटित, ठेका आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठीची तरतुदी अपुऱ्या असल्याचे त्यांनी नमूद(Labour Law Protest) केले.
या आंदोलनात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
Police Bribery:‘हफ्ता’ न दिल्यास रिक्षा अडवणाऱ्या महिला पोलीस शिपाई आणि ट्रॅफिक वॉर्डनला ACBचा सापळा
प्रतिनिधी: पिंपरी वाहतूक विभागातील एक महिला पोलीस शिपाई आणि एका ट्रॅफिक वॉर्डनला ४०० रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. रिक्षा चालकाकडून दर महिन्याला ५०० रुपयांचा ‘हफ्ता’ मागितल्याची तक्रार आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये महिला पोलीस अंमलदार वर्षा विठ्ठल कांबळे (३५) आणि ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा मछिंद्र गव्हाणे (२८) यांचा समावेश आहे. तक्रारदार रिक्षाचालक पिंपरी, मोरवाडी आणि केएसबी चौक परिसरात प्रवासी (Police Bribery)वाहतूक करतात.
१७ नोव्हेंबर रोजी जादा प्रवासी घेतल्याच्या कारणावरून आरोपींनी रिक्षा चालकाकडून ३०० रुपये घेतले होते. त्यानंतर २६ नोव्हेंबरला पुन्हा रिक्षा अडवून दर महिन्याला ५०० रुपयांचा हफ्ता देण्याची मागणी केली. सततच्या छळाला कंटाळून रिक्षा चालकाने एसीबीकडे तक्रार (Police Bribery)दाखल केली.
तक्रारीची पडताळणी करताना आरोपींनी तडजोडीअंती ४०० रुपयांची लाच मागितल्याचे उघड झाले. त्यानुसार २९ नोव्हेंबर रोजी केएसबी चौकात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ४०० रुपये घेताच वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांना ACBने रंगेहात पकडले. त्यानंतर महिला पोलीस शिपाई वर्षा कांबळे यांनाही ताब्यात घेण्यात (Police Bribery)आले.
या प्रकरणी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई (Police Bribery) करण्यात आली.
Prostitution Racket:पिंपळे सौदागरमध्ये स्पाच्या आड वेश्याव्यवसाय; सात तरुणींची सुटका
पिंपळे सौदागर (पिंपरी-चिंचवड) — पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या मानववळण प्रतिबंधक पथकाने पिंपळे सौदागर येथील “The Aura Thai Spa” वर कारवाई करत स्पाच्या आड सुरु असलेला वेश्याव्यवसाय उघडकीस आणला. या कारवाईत सात तरुणींची सुटका करण्यात आली असून स्पा मालकाला अटक करण्यात आली (Prostitution Racket) आहे.
रोस आयकॉन बिल्डिंगमधील शॉप क्रमांक २०१ ते २०४ मध्ये चालणाऱ्या या स्पामध्ये अवैध गतिविधी सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. खातरजमा करण्यासाठी पथकाने बनावट ग्राहक पाठवून शहानिशा केली. माहिती खरी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून( Prostitution Racket)सात तरुणींची सुटका केली.
सुटलेल्या तरुणी या नागालँड, मिजोराम, त्रिपुरा, केरळ आणि महाराष्ट्रातील असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यांना उच्च उत्पन्नाचे आमिष दाखवून स्पामध्ये कामासाठी आणले जात होते, मात्र प्रत्यक्षात त्यांना अवैध कृत्यांसाठी प्रवृत्त केले जात असल्याचे समोर (Prostitution Racket)आले.
या प्रकरणात स्पा मालक अभिजित लोरन्स (वय ३०, रा. पिंपळे सौदागर; मूळ रहिवासी तिरुअनंतपुरम, केरळ) याच्याविरोधात भारतीय दंड विधान आणि पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात(Prostitution Racket) आली आहे.
मानववळण प्रतिबंधक पथकाने केलेल्या या कारवाईमुळे परिसरातील अवैध स्पा आणि तत्सम व्यवसायांवर धाक बसला आहे. पोलिसांनी अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवसायांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन नागरिकांना केले (Prostitution Racket)आहे.
संभाजीनगर (चिंचवड) – “संतांनी आपल्या विचारांनी नांगरलेल्या भूमीत आपण राहतो, हे आपले परमभाग्य आहे. अन्याय, अनीती, अधर्म आणि अनाचारावर मात करण्याची प्रेरणा संतसाहित्यातून मिळते. मनामनात साठलेली अविवेकाची काजळी दूर झाली तर समाज विवेकशील बनतो. विवेकशील समाजालाच सुदृढ समाज म्हटले पाहिजे. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांनी उत्तम जीवनमार्ग दाखविला असून तो आजच्या काळातही तितकाच मार्गदर्शक आहे. संतांनी समाजाला विवेकवादाची शिकवण दिली,” असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते ह. भ. प. राजेंद्र घावटे(Sant Pravachan) यांनी केले.
संभाजीनगर, चिंचवड येथील श्री दत्त मंदिरामध्ये गुरुदत्त सेवा मंडळाच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते. ज्ञानेश्वरीच्या चौथ्या अध्यायातील “मी अविवेकाची काजळी। फेडोनी विवेक दीप उजळी॥ ते योगिया पाहे दिवाळी॥ निरंतर॥” या ओवीचा आशय केंद्रस्थानी ठेवून घावटे यांनी संतवाङ्मयातील विवेक, ज्ञान आणि (Sant Pravachan)जीवनमूल्यांवर भाष्य केले.
या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष शामकांत मोरे, दिलीप सावंत, अभिमन्यू भारसाकडे, दीपक पालांडे, आनंद देसाई, तुकाराम घारे, मुरलीधर वाघ, विजय जाधव आदी मान्यवर( Sant Pravachan)उपस्थित होते.
पुढे बोलताना घावटे म्हणाले, “बदलत्या काळातील आव्हाने ओळखून आचारशील आणि विचारशील पिढ्या घडल्या पाहिजेत. त्यासाठी भागवत धर्माचा मार्ग अवलंबणे आवश्यक आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील प्रत्येक ओवी जीवनाला दिशा देणारी आहे. लालित्यपूर्ण, कोमल, सात्विक आणि रसाळ भाषेचा अनुपम आविष्कार ज्ञानेश्वरीत आढळतो. प्रत्येक ओवीचा भावार्थ समजून त्यातून प्रेरणा घेणे ही अखंड प्रक्रिया आहे. संतांच्या विचारांचा प्रकाश पिढ्यान्पिढ्या मार्गदर्शक ठरत आला आहे; यापुढेही तो टिकवण्याची जबाबदारी आपलीच आहे. समाजाच्या जडणघडणीसाठी हे अत्यंत आवश्यक आहे. केवळ मंदिरनिर्मितीपेक्षा संतसाहित्यातून समाजाचे प्रबोधन घडवणारी ‘समाज मंदिरे’ उभी राहिली, तर परिवर्तन(Sant Pravachan )नक्कीच घडू शकते.”
कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन अभिमन्यू (Sant Pravachan)भारसाकडे यांनी केले.
Pune Cold Wave,:पुणे हवामान अपडेट: तापमानात घट; पुढील दोन दिवसांत थंडीचे पुनरागमन
पुणे – गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि उपनगर परिसरात कमाल व किमान तापमानात वाढ होत असल्याने थंडी कमी जाणवत होती. मात्र हवामानात झालेल्या बदलानंतर पुढील दोन दिवसांत किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे शहरात (Pune Cold Wave)थंडीचे पुनरागमन होण्याची चिन्हे दिसत आहेत.
शनिवारी (ता. २९) पुण्यातील तापमानात किंचित घसरण नोंदविण्यात आली. दिवसभरात किमान तापमान १४.४ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस होते. मागील तीन दिवसांत किमान तापमानात तब्बल दोन अंशांची घट झाली आहे. हवामान खात्यानुसार ही घट पुढील दोन दिवस कायम(Pune Cold Wave) राहण्याची शक्यता आहे.
रविवारी (ता. ३०) किमान तापमान आणखी कमी होऊन ते सुमारे १३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस राहील. आकाश मुख्यतः निरभ्र राहील, असेही नमूद करण्यात आले(Pune Cold Wave) आहे.

मात्र मंगळवारपासून (ता. २) तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता असून पुढील तीन दिवसांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. दिवसाच्या उत्तरार्धात आकाश अंशतः ढगाळ राहील, तर अन्यवेळी वातावरण निरभ्र राहील, असा अंदाज(Pune Cold Wave) हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.

PCMC Job Fair:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद | ५० कंपन्या आणि १ हजार नोकऱ्या
प्रतिनिधी :पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समाज विकास विभाग आणि लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सिटी हब फॉर डेटा कम्युनिकेशन (सीएचडीसी) उपक्रमांतर्गत युवक–युवतींसाठी आयोजित रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चिंचवड येथील ऑटो क्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित या मेळाव्यात ५० हून अधिक कंपन्यांनी सहभाग नोंदवत १ हजारपेक्षा अधिक नोकरीच्या संधी उपलब्ध करून (PCMC Job Fair )दिल्या.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपायुक्त ममता शिंदे यांच्या अधिपत्याखाली हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. फिल्ड ऑफिसर, एक्झिक्युटिव्ह, इंजिनिअरिंग, अकाउंट्स, कस्टमर सर्व्हिस, सेल्स प्रतिनिधी अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात(PCMC Job Fair ) आली.
१०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा ते ग्रॅज्युएटपर्यंत सर्व शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांनी मेळाव्यात मोठ्या संख्येने हजेरी लावली. विविध नामांकित कंपन्यांच्या उपस्थितीमुळे तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. कंपन्यांनी मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रेही(PCMC Job Fair ) प्रदान केली.
मेळाव्याला महापालिकेचे उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच लाइट हाऊस कम्युनिटी फाउंडेशनचे विजय प्रकाश, जय देवकर, लखन रोकडे, काकासाहेब भुरे, रुपेश कुऱ्हाडे आदी मान्यवरांनी भेट दिली.
महापालिकेचा सीएचडीसी प्रकल्प डेटा विश्लेषणाच्या आधारे नागरिकांच्या गरजांनुसार सेवा पुरविण्यावर भर देत असून, त्याचाच एक भाग म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. शहरातील सुशिक्षित युवक–युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे समाज विकास विभागाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले की, शहरातील तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी महापालिका ठोस पावले उचलत आहे आणि पुढील काळातही अशा उपक्रमांची व्याप्ती वाढविण्याचा मानस आहे. अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांनी तरुणांना कौशल्य आणि संधी यांचा दुवा मिळवून देणे हे महापालिकेचे ध्येय असल्याचे सांगितले. उपायुक्त ममता शिंदे यांनी कंपन्या आणि उमेदवार यांना एकाच व्यासपीठावर आणणारा हा मेळावा अत्यंत यशस्वी ठरल्याचे नमूद केले.
Highway Cab Crash:मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर दोन कॅबचा भीषण अपघात | दोन्ही गाड्या उलटल्या
प्रतिनिधी :मुंबई–पुणे जुन्या महामार्गावर दोन कॅब कारचा भीषण अपघात झाला आहे. निगडीवरून देहूरोडकडे जात असताना आज (Highway Cab Crash)पहाटे जुना मुंबई–पुणे मार्गावर हा अपघात घडला.
एका कॅबने दुसऱ्या कॅबला मागून जोरदार धडक दिल्यामुळे दोन्ही गाड्या रस्त्याच्या कडेला पलटी झाल्या. या दुर्घटनेत कॅबमधील प्रवासी तसेच चालक जखमी झाले आहेत. देहूरोड येथील जुना जकात नाका परिसरात हा अपघात झाला (Highway Cab Crash)असल्याचे समजते.
Janta Raja:मोशी येथे ‘जाणता राजा’ महानाट्य | आमदार महेश लांडगे वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन
प्रतिनिधी: भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण भोसरी परिसरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा नेते निखिल बोऱ्हाडे यांच्या संकल्पनेतून, भोसरी विधानसभा मतदारसंघात प्रथमच बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘जाणता राजा’ या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा भव्य प्रयोग ६ आणि ७ डिसेंबर रोजी सादर होणार(Janta Raja )आहे.
