पिंपरी-चिंचवड (विवेक कुलकर्णी ): किवळे परिसरात विकासकामांचा वेग वाढवणारे माजी नगरसेवक बापू कातळे यांचे कार्य पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहे. केवळ सत्तेचा आधार न घेता जनतेच्या विश्वासावर उभे राहून काम करणारा नेता कसा असावा, याचे उदाहरण म्हणून कातळे यांच्याकडे पाहिले जात (Bapu Katale Kiwale) आहे.
“प्रवाहासोबत राहून कोणीही पैलतिर गाठू शकते; मात्र प्रवाहाच्या विरोधात जाऊन यश मिळवणारा खरा योद्धा असतो,” या उक्तीप्रमाणे कातळे यांनी आपल्या राजकीय प्रवासात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहरात एका बाजूला प्रबळ लाट असतानाही त्यांनी सेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवत मतब्बर उमेदवारांना पराभूत करत विजय (Bapu Katale Kiwale)मिळवला.
विशेष म्हणजे, स्वतः निवडणूक लढवण्याऐवजी त्यांनी आपल्या पत्नी रेश्मा कातळे यांना महापालिकेत पाठवण्याचा निर्णय घेतला. किवळे वॉर्ड क्रमांक १६ मधील मतदारांनी या निर्णयाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत केवळ रेश्मा कातळे यांनाच नव्हे, तर संपूर्ण पॅनललाच विजय मिळवून दिला. हा विजय केवळ राजकीय नव्हता, तर नागरिकांनी व्यक्त केलेला विश्वास(Bapu Katale Kiwale) होता.
या विश्वासाची परतफेड करण्यासाठी कातळे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विकासकामांचा धडाका लावला आहे. सत्तेत नसतानाही विरोधी पक्षातील नगरसेवक म्हणून काम करताना निधीची कमतरता, प्रशासनाचे मर्यादित सहकार्य अशा अडचणींना सामोरे जावे लागते; मात्र या सर्व अडथळ्यांवर मात करत त्यांनी वॉर्डातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि नागरी सुविधा या मूलभूत प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत “नागरिकांच्या हितासाठी कायम तत्पर” हा आपला दृष्टिकोन त्यांनी प्रत्यक्षात उतरवला(Bapu Katale Kiwale) आहे.
नुकताच बापू कातळे यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. मोठा जल्लोष टाळत “ज्या नागरिकांमुळे माझी पत्नी नगरसेवक झाली, त्यांच्या समस्या सोडवणे हेच माझ्यासाठी सर्वात मोठे सेलिब्रेशन आहे,” असे सांगत त्यांनी जनतेप्रती आपली बांधिलकी पुन्हा अधोरेखित (Bapu Katale Kiwale)केली.
आजच्या काळात किरकोळ कामांनाही मोठी प्रसिद्धी दिली जाते; अशा परिस्थितीत स्वतःचे कौतुक टाळून शांतपणे काम करणारे आणि मतदारांप्रती जबाबदारी जपणारे नेते विरळच आहेत. बापू कातळे हे त्यापैकीच एक नाव ठरत (Bapu Katale Kiwale)आहेत.
एकूणच, किवळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून “आम्ही योग्य प्रतिनिधी निवडला,” अशी भावना व्यक्त होत आहे. विकासाच्या दिशेने सातत्याने वाटचाल करताना जनतेचा विश्वास कायम राखणे हेच कातळे यांच्या कामाचे खरे यश मानले जात आहे. भविष्यातही त्यांच्या प्रामाणिक आणि जनहिताच्या कार्यातून हा विश्वास अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात (Bapu Katale Kiwale)आहे.
