पिंपरी-चिंचवड शहरातील आगामी महापालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात दाखल झाली आहे. निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम यंत्रे तसेच आवश्यक निवडणूक साहित्याचे वितरण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले आहे. शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांमधून एकूण २,०६७ मतदान केंद्रांसाठी तब्बल ७,१६२ ईव्हीएम मशीनचे वाटप करण्यात आले (EVM Distribution) आहे.
हे साहित्य घेऊन निवडणूक कर्मचारी पोलीस बंदोबस्तासह संबंधित मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून मतदान शांततेत, सुरळीत आणि पूर्णतः पारदर्शक पद्धतीने पार पडावे यासाठी प्रशासन सज्ज (EVM Distribution) आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरातील १२८ जागांसाठी तब्बल ६९२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य आता ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. मतदारांनी निर्भयपणे आणि मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले (EVM Distribution)आहे.
