मुंबई :रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण आणि वाहतुकीतील बेफिकिरी रोखण्यासाठी राज्य सरकारने अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. नव्या वाहतूक नियमावलीनुसार (Traffic Offence Rule) आता एका वर्षात पाच वेळा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या चालकाचा वाहन परवाना (Driving License) थेट रद्द केला जाणार आहे. विशेष म्हणजे, यामध्ये हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे किंवा वाहतूक सिग्नल तोडणे यांसारख्या सामान्य वाटणाऱ्या उल्लंघनांचाही समावेश करण्यात आला (New Traffic Rules) आहे.
आरटीओला अधिकार, चालकाला संधी बंधनकारक
वाहन परवाना रद्द करण्याचे सर्वाधिकार आता आरटीओ किंवा जिल्हा परिवहन कार्यालयाला देण्यात आले आहेत. मात्र, नव्या तरतुदीनुसार कोणत्याही चालकाचा परवाना रद्द करण्यापूर्वी संबंधित परवानाधारकाला आपली बाजू मांडण्याची संधी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिकृत अधिसूचना बुधवारी प्रसिद्ध करण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२६ पासून राज्यभरात लागू झाली (New Traffic Rules) आहे.आहे.
आधी कधी लायसन्स रद्द होत होते का?
नवीन अधिसूचनेनुसार, एका वर्षापूर्वी केलेले वाहतूक नियमांचे उल्लंघन पुढील वर्षी ग्राह्य धरले जाणार नाही. सध्या एकूण २४ प्रकारचे वाहतूक गुन्हे आहेत, ज्यांच्या आधारे संबंधित अधिकारी वाहन परवाना रद्द करू शकतात. यामध्ये वाहन चोरी, प्रवाशावर हल्ला, प्रवाशाचे अपहरण, वेगमर्यादा ओलांडणे, क्षमतेपेक्षा जास्त सामान वाहून नेणे, तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहन बेवारस सोडून जाणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश(New Traffic Rules) आहे.
नव्या कडक तरतुदी काय आहेत?
आतापर्यंत गंभीर गुन्ह्यांपुरती मर्यादित असलेली कारवाई आता अधिक व्यापक करण्यात आली आहे. नव्या तरतुदीनुसार, हेल्मेट न घालणे, सीट बेल्ट न लावणे, सिग्नल तोडणे यांसारख्या तुलनेने कमी तीव्रतेच्या गुन्ह्यांचाही पाच उल्लंघनांमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे नियम वारंवार मोडल्यास चालकाचा वाहन परवाना रद्द होण्याची शक्यता वाढली(New Traffic Rules) आहे.
वाहनचालकांसाठी इशारा
